पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः खारघर परिसरातील एका रिक्षा चालकाची रिक्षा बसलेल्या प्रवाश्याने माझ्याकडे सोने तपासणी करण्याचे मशीन आहे. असे सांगून त्या रिक्षा चालकाच्या हातात असलेली 35,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी घेऊन पसार झाला. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून खारघर पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.
दशरथ लक्ष्मण कांबळे (वय 56 वर्षे) राहणार खारघर सेक्टर 14 येथे राहत असून रिक्षा व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. तसेच त्यांची रिक्षा एमएच 43 बीएफ 2628 ही आहे. या रिक्षाद्वारे खारघर परिसरातील उत्पन्न मिळवीत आहेत. यावेळी कांबळे हे खारघर परिसरातून एक प्रवासी घेऊन सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्याच्या बाजूला त्या प्रवाश्याला सोडून दिले. त्याचबरोबर कांबळे हे दुसर्या प्रवाश्याची वाट बघत थांबले होते. काही वेळाने त्याठिकाणी एक प्रवासी आला. व रिक्षात बसून खारघर कोपरा येथे जायाचे असे कांबळे यांना सांगितले. व खारघर कोपरा येताच त्या भामट्याने कांबळे यांना सांगितले कि माझ्याकडे सोने असली आहे कि नकली हे तपासणीचे मशीन आहे. सुरुवातीला त्या रिक्षा चालकांचे विश्वास संपादन केले. मशीनमध्ये तपासणीसाठी कांबळे यांच्या बोटात असलेली अंदाजे 35,000 /- रुपये किंमतीची सोन्याची अंगठी घेऊन गेला व तो भामटा परत आलाच नाही. याबाबत रिक्षा चालकाने खारघर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. व पोलिसांनी गुन्हा दाखल होताच पुढील शोध सुरु केला आहे.
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment