पनवेल, (प्रतिनिधी) -- लोक सेवा करत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांच्याबद्दल असे अपशब्द व असंस्कृत भाषा वापरणे योग्य नाही सदरचे वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगत मंडळ अधिकारी मेट्रो सेंटर नं 1 यांनी पनवेल तालुका तलाठी मेट्रो सेंटर कार्यालयाच्या बाहेर निषेध व्यक्त करीत धरणे आंदोलन करण्यात आला. यावेळी ई महाभूमी राज्य प्रकल्प समन्वय अधिकारी रामदास जगताप यांची बदली अन्य ठिकाणी करावी अशी मागणी यावेळी भट यांनी केली. यावेळी मंडळ अधिकारी नीता वारे, तलाठी रफिक पठाण यांच्यासह तलाठी उपस्तित होते.
महाराष्ट्रात अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे राज्यात आपत्तीची परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रात युद्धपातळीवर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.या परिस्थितीत तलाठी व मंडळअधिकारी संवर्गात शासनाने प्राधान्यक्रमाने सांगितलेले काम ई पीक पाहणी व मोफत 7/12 वाटप ही कामे चालू आहेत. हा संदेश राज्य अध्यक्ष यांनी सर्व तलाठी बांधवाना दिलेला होता. मात्र लोक सेवा करत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांच्याबद्दल असे अपशब्द व असंस्कृत भाषा वापरणे योग्य नाही सदरचे वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे असल्याचे मंडळ अधिकारी यांनी महेश भाट यांनी सांगत सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका तलाठी संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून यासंदर्भात ई महाभूमी राज्य प्रकल्प समन्वय अधिकारी रामदास जगताप यांची तात्काळ बदली अन्य ठिकाणी करावी, त्याचबरोबर बदली झाली नाही तर राज्य संघनेच्या वतीने यापेक्षाही जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी भाट यांनी दिला.
Comments
Post a Comment