पनवेल(प्रतिनिधी)-आज पनवेल येथे प्रकाश मत्रे संपादक असलेल्या,"बोलता तारा" या मराठी वृत्तपत्राचे प्रकाशन लोकनेते मा.रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते संपंन्न झाले.याप्रसंगी बोलताना लोकनेते म्हणाले की,"बोलता तारा" चे संपादक पत्रकार प्रकाश मत्रे यांनी आपल्या पत्रकार क्षेत्रातील अनुभवातून समाजाला बोलतं करण्यासाठी प्रबोधन,जनजागृती, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले असून त्यांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा देतो.तसेच प्रकाश मत्रे हे संयमी व्यक्तिमत्त्व असून,ते या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसेवा करतील असे प्रतिपादनही त्यांनी केले.
आज रविवार १० आँक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११-३० वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार व साप्ताहिक भिमसंग्राम चे संपादक मुकेश शिंदे यांनी आपल्या प्रबोधन शैलीत केले व कोरोना काळात रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांना केलेल्या सहकार्याबदल त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी "खारघर पत्रकार संघाचे" अध्यक्ष व जनसभा वृत्तपत्राचे संपादक आप्पासाहेब मगर यांनी लोकनेते मा.रामशेठ ठाकूर आणि उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.तसेच प्रकाश मत्रे हे सकारात्मक पत्रकारिता करणारे पत्रकार असून आता तर ते संपादक झाल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगीतले.
याप्रसंगी खारघर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ‘जनसभा’ वृत्तपत्राचे संपादक आप्पासाहेब मगर, ‘भिमसंग्राम’चे संपादक मुकेश शिंदे, द वेस्टर्न आॕब्जर्व्हरचे संपादक प्रमेन्द्र सिंह, ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड, ‘खारघर ग्रीन सिटी टाईम्स’चे संपादक शेखर सपानी, ‘सदैव जागृत’चे संपादक मयूर बर्वे, ‘नवलोकहित दृष्टी’चे संपादक संदेश सोनमळे, ‘अभेद्य प्रहार’चे उपसंपादक शंकर वायदंडे, सागर प्रॉपर्टीज् अॅण्ड इनवेस्टमेंट्सचे प्रोप्रायटर व बोलता ताराचे उपसंपादक सागर चव्हाण, भागवत कवर, संपादक प्रकाश मत्रे तसेच चि.अक्षद मत्रे आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
Comments
Post a Comment