Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

बेकायदेशीर व्यावसायिकांवर सिडकोची धडक कारवाई

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः खांदा कॉलनी येथील मोकळ्या भूखंडावर असलेल्या व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. यावेळी त्याठिकाणी बांधण्यात आलेला ढाबा, गॅरेज, दुकाने जमीनदोस्त केली. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमत पोलीस पथकाच्या सहकार्याने अचानक राबविण्यात आल्याने व्यवसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. येथील व्यवसायिकांना सिडको अतिक्रमण विभागाकडून कारवाईबाबत याआधी नोटिसी दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही येथील अतिक्रमणे काढली नसल्याने सिडकोच्या अतिक्रमण विभागाने खांदा कॉलनी येथील देशी तडाखा हॉटेलच्या शेजारील असलेल्या भूखंडावर अतिक्रमण केलेल्या ढाबा, गॅरेज, दुकानदार, यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे येथील अतिक्रमण वाढत चालल्या असल्याच्या त्यानुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि फुटपाथवरील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला आहे. या मोहिमेत चार विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. यांच्यासह जेसीबी, ट्रक, पोलीस पथक सहभागी झ

अंगठी सोन्याची आहे कि नाही तपासणीच्या नावाने केली फसवणूक...

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः खारघर परिसरातील एका रिक्षा चालकाची रिक्षा बसलेल्या प्रवाश्याने माझ्याकडे सोने तपासणी करण्याचे मशीन आहे. असे सांगून त्या रिक्षा चालकाच्या हातात असलेली 35,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी घेऊन पसार झाला. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून खारघर पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत. दशरथ लक्ष्मण कांबळे (वय 56 वर्षे) राहणार खारघर सेक्टर 14 येथे राहत असून रिक्षा व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. तसेच त्यांची रिक्षा एमएच 43 बीएफ 2628 ही आहे. या रिक्षाद्वारे खारघर परिसरातील उत्पन्न मिळवीत आहेत. यावेळी कांबळे हे खारघर परिसरातून एक प्रवासी घेऊन सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्याच्या बाजूला त्या प्रवाश्याला सोडून दिले. त्याचबरोबर कांबळे हे दुसर्‍या प्रवाश्याची वाट बघत थांबले होते. काही वेळाने त्याठिकाणी एक प्रवासी आला. व रिक्षात बसून खारघर कोपरा येथे जायाचे असे कांबळे यांना सांगितले. व खारघर कोपरा येताच त्या भामट्याने कांबळे यांना सांगितले कि माझ्याकडे सोने असली आहे कि नकली हे तपासणीचे मशीन आहे. सुरुवातीला त्या रिक्षा चालकांचे विश्‍वास संपादन के

सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यामार्फत उड्डाण पुलावरील खड्ड्यांची पुन्हा दुरुस्ती

पनवेल(प्रतिनिधी)- पनवेल मधील तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. एमएसआरडीसी विभागास पुलावर पडलेल्या खड्ड्यांचे काम करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या कडून सदर कामात दिरगांई होत होती. सदर उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ऑगस्ट महिन्यात स्व खर्चाने या उड्डाणपुलावरील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती केली. या पुलावर वाहनांची सतत वाहतूकीमुळे पुन्हा तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावर खड्डे पडल्याचे दिसुन आले आहे. याकारणास्तव सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यामार्फत सदर उड्डाण पुलावरील खड्डे पुन्हा दुरुस्ती करून देण्यात आले असून त्यांच्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

महिला बचत गटातर्फे दिवाळी निमित्त प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन....

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः नवी मुंबईतील महिला उद्योजिका तसेच महिला बचत गट यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त पनवेलमध्ये भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.   पनवेलच्या के.गो.लिमये वाचनालय येथे 22, 23 ,24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत या भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव तसेच चित्रपट व नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात ज्वेलरी,अगरबत्ती, कपडे,फरसाण, मिठाई व पर्सेस, हर्बल प्रोडक्ट, आयुर्वेदिक तेल,दिवे, मसाले,सुगंधी उटणे,बेडशीट आदी  वस्तूंची विक्री प्रदर्शनात होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन सुनिता खिल्लारे व संगीता थोरात यांनी केले आहे.

युवा मोर्चाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन-आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पोस्टरचे उदघाटन

पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावली निमित्त ' भव्य किल्ले स्पर्धा २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. २१) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा येथे महाराजांना अभिवादन करून करण्यात आले.  यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम महाडिक, युवा नेते संजय जैन, गौरव कांडपिळे, चिन्मय समेळ, केदार भगत, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, विवेक होन, शावेज रिझवी, आत्मनिर्भर भारतचे रायगड जिल्हाध्यक्ष आकाश भाटी, नूतन पाटील, यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.   दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आह

बेकायदेशीररित्या वाहन पार्कींगमुळे फुटपाथ गिळंकृत ; व्यापार्‍यांसह स्थानिक रहिवाशांनी केला संताप व्यक्त.....

पनवेल  /  दि.21 (संजय कदम) ः  नवीन पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या तसेच चार चाकी वाहने मन मानेल तशी उभी करण्यात येत असल्याने पादचार्‍यांसाठी ये-जा करण्यासाठी असलेला फुटपाथ गिळंकृत झाला असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह व्यापार्‍यांनी संताप व्यक्त करून वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. नवीन पनवेल परिसरातील रेल्वे स्टेशन समोरील असलेल्या अनेक सोसायटीच्या परिसरात दुकानात व गल्ल्यांमध्ये बेकायदेशीररित्या दुचाकी व चार चाकी वाहने उभी करून गाडी चालक मालक हे आपल्या कामानिमित्त रेल्वेने जातात. अनेक जण तर दुचाकी वाहने फुटपाथवरच उभी करून निघून जातात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना व व्यापार्‍यांना तेथून ये-जा करणे मोठे जिकरीचे बनते. या संदर्भात पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रार करून सुद्धा टोईंग व्हॅन कारवाई करत नसल्याबद्दल येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्ण वाहिका सुद्धा अशा रस्त्यावरुन जावू शकत नाही. तर अचानक आग लागल्यास अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी कसे पोहोचतात असा सवाल सुद्धा येथील रहिवाशी करीत आहेत. य

कोपरा गावातील ये-जा करण्यासाठी बंद केलेला रस्ता पूर्वरत चालू : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत...

पनवेल (खारघर) वार्ता : काही दिवसापूर्वी खारघर शहरातील कोपरा गावामध्ये हुंदई शोरूम सेक्टर- १० समोरील रस्ता पी.डब्ल्यु.डी च्या अधिकार्यांतच्या मार्फत बंद करण्यात आला होता. कोपरा गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने याची शिवसेनेचे शाखा प्रमुख सचिन ठाकुर यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख यांच्या कडे निवेदणाद्वारे नागरिकांची व्यथा मांडली असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी तत्काळ खारघर विभागातील पी.डब्ल्यु.डी च्या संबंधित अधिकार्‍यांना याबद्दल ची चौकशी करून बंद केलेला रस्ता पूर्वरत चालू करण्याकरिता निवेदणाद्वारे मागणी केली.        सदर गोष्टीची दखल घेत पी.डब्ल्यु.डी च्या तुर्बे येथील विभागाने त्वरित रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना शिवसेना पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड व शाखा प्रमुख सचिन ठाकुर उपस्थित होते...

मंगळवारी गव्हाण कोपर येथे शासकीय दाखले वाटप शिबीर

पनवेल(प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.                                रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणी नुसार ग्रामीण व शहरी भागात सहा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली व कामोठे येथे दाखले वाटप शिबीर पार पडले. गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये होणाऱ्या या शिबिर

नवरात्रौत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन

पनवेल(प्रतिनिधी) नवरात्रौत्सवानिमित्त उलवा नोड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले.       जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (कोपर), रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व तामिळ संघम सेक्टर १९, लांगेश्वर मित्र मंडळ मोरावे आणि व्यापारी एकता मित्र मंडळ मोरावे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आयोजकांच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोळी समाजाचे नेते उत्तम कोळी, युवा नेते मदन पाटील, निलेश खारकर, नितेश म्हात्रे, विशाल म्हात्रे, राजू खारकर, शैलेश भगत, अनुसया घरत, प्रिया अडसुळे, आरती तिवारी, प्रियांका शिंदे, कृष्णा सगादेवन, शेखर नडार, शिवकुमार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

रामदास जगताप यांची बदली अन्य ठिकाणी करा-पनवेलमधील तलाठयांचे धरणे आंदोलन

पनवेल, (प्रतिनिधी) -- लोक सेवा करत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांच्याबद्दल असे अपशब्द व असंस्कृत भाषा वापरणे योग्य नाही सदरचे वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगत मंडळ अधिकारी मेट्रो सेंटर नं 1 यांनी पनवेल तालुका तलाठी मेट्रो सेंटर कार्यालयाच्या बाहेर निषेध व्यक्त करीत धरणे आंदोलन करण्यात आला. यावेळी ई महाभूमी राज्य प्रकल्प समन्वय अधिकारी रामदास जगताप यांची बदली अन्य ठिकाणी करावी अशी मागणी यावेळी भट यांनी केली. यावेळी मंडळ अधिकारी नीता वारे, तलाठी रफिक पठाण यांच्यासह तलाठी उपस्तित होते. महाराष्ट्रात अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे राज्यात आपत्तीची परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रात युद्धपातळीवर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.या परिस्थितीत तलाठी व मंडळअधिकारी संवर्गात शासनाने प्राधान्यक्रमाने सांगितलेले काम ई पीक पाहणी व मोफत 7/12 वाटप ही कामे चालू आहेत. हा संदेश राज्य अध्यक्ष यांनी सर्व तलाठी बांधवाना दिलेला होता. मात्र लोक सेवा करत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलाठी अ

बोलता तारा" या मराठी वृत्तपत्राचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये प्रकाशन

पनवेल(प्रतिनिधी)-आज पनवेल येथे प्रकाश मत्रे संपादक असलेल्या,"बोलता तारा" या मराठी वृत्तपत्राचे प्रकाशन लोकनेते मा.रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते संपंन्न झाले.याप्रसंगी बोलताना लोकनेते म्हणाले की,"बोलता तारा" चे संपादक पत्रकार प्रकाश मत्रे यांनी आपल्या पत्रकार क्षेत्रातील अनुभवातून समाजाला बोलतं करण्यासाठी प्रबोधन,जनजागृती, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले असून त्यांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा देतो.तसेच प्रकाश मत्रे हे संयमी व्यक्तिमत्त्व असून,ते या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसेवा करतील असे प्रतिपादनही त्यांनी केले.          आज रविवार १० आँक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११-३० वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार व साप्ताहिक भिमसंग्राम चे संपादक मुकेश शिंदे यांनी आपल्या प्रबोधन शैलीत केले व कोरोना काळात रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांना केलेल्या सहकार्याबदल त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.            कार्यक्रमाच्या शेवटी "खारघर पत्रकार संघाचे" अध्यक्ष व जनसभा वृत्तपत्राचे संपादक आप्पासा

स्वच्छता दुतांचा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत प्रभाग क्र १८ मधील स्वच्छता दुतांचा सत्कार विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी स्वच्छता दुतांचे सन्मान करत कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले.               आपला परिसर स्वछ व सुंदर ठेवण्यात स्वच्छता दुतांचा मोठा वाटा असतो. स्वच्छता दुत हे नेहमी आपले शहर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. याच गोष्टीची जाणीव ठेवून पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी स्वच्छता दुतांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, पालिका अधिकारी शैलेश गायकवाड, स्वच्छता दूत यावेळी उपस्थित होते. अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दुतांचा सन्मान केला. कोरोना काळात आपण सर्वजण घरात होतो. मात्र हे स्वच्छतादूत रोड व दररोज स्वच्छतेचा ध्यास घेऊन काम करत होते अशा

कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात १ हजार लेकींचे लसीकरण

पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात पार पडलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात १ हजार पनवेलच्या लेकींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत या महाशिबीराला उदंड प्रतिसाद लाभला.  दोन दिवसीय या महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली (दि. ०२)आयोजित करण्यात आले होते.  यावेळी या शिबिराच्या उत्तम नियोजनाबद्दल नामदार भारती पवार यांनी भरभरून कौतुक केले होते.    गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या 'हाय रिस्क' प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचे रोपण

पनवेल(प्रतिनिधी) पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. ३) औषधी वनस्पतींचे रोपणाचा कार्यक्रम कामोठे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. २० प्रकारची विविध उपयोगी औषधी आयुर्वेदिक झाडे या वेळी लावण्यात आली.    या कार्यक्रमासाठी उपमहापौर जगदीश गायकवाड, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत, नगरसेवक गोपीनाथ भगत, नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कूत्तरवडे,नगरसेविका संतोषी तुपे, नगरसेविका हेमलता गोवारी, युवा नेते हेप्पी सिंग, समाजसेवक रवी गोवारी, समाजसेवक प्रकाश पाटील  ,सरचिटणीस शरद जगताप , व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नानाशेठ मगदूम,बूथ अध्यक्ष स्वप्नील पाटील, संदीप तुपे,  प्रज्ञा प्रकोष्ठ संयोजक सुहास पाटील, हरजिंदर कौर, दीपाली तिवारी,  सोशल मीडिया संयोजक प्रवीण वाघमारे, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, विजय लोखंडे, मनीषा वणवे, सुरेखा लांडे, जयश्री गाडगे, लता गोडगे, सोनाली खरटमोल, उत्तम जा

ग्रामस्थांचा विरोध डावलून पनवेलमध्ये एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही! आमदार प्रशांत ठाकूर यांची स्पष्ट भूमिका

पनवेल( प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील कोळवाडी व पाले बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांचा विरोध डावलून तेथे एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जमीन संपादनाबाबत चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडली. कोळवाडी व पाले बुद्रुक परिसरातील 180 एकर जमीन एअर फोर्स प्रकल्पासाठी संपादन करण्याबाबत पनवेलच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी बोलाविलेल्या  बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, शिवसेनेचे बबन पाटील, पं. स. सदस्य काशिनाथ पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे आमोद ठक्कर, संरक्षण खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सर्वांनी या भूसंपादनाला विरोध दर्शविला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, या प्रकल्पाला 180 एकर जागा लागणार असून त्यामुळे 900 चौरस मीटर परिसरातील ग्रामस्थांच्या बांधकामांवर बंधन येणार आहेत. तीन मीटरपेक्षा उंच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ते पाहता देशासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा

रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन साजरा

सातारा(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स या महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोल्हापूर  विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.हेमंत कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.   रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की ,’’केवळ ३० रुपये व ४ विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देत ग्रामीण भागात ज्ञानदान करणारी  ही संस्था केवळ शिक्षण देत नसून ती विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.विविध संस्थाशी सामंजस्य करार करून ती विद्यार्थ्याचे भवितव्य घडवीत आहे .ती विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडत नाही.हीच जाणीव ठेवून रयतचा कारभार होत राहिला तर रयतचे ग्रामीण विद्यापीठ पाहण्यास

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चला सदिच्छा भेट

पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे जेष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि. ०४) वर्ये (सातारा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या शुभ हस्ते अंतीम वर्षातील कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅनरचे प्रकाशन करण्यात आले.   कोरोना काळात इन्स्टिट्यूट ने केलेल्या कामाचे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. तसेच गतवर्षी संशोधन व पेटंट नोंदणी केल्याबद्दल डॉ सारंग भोला यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच काॅपीराईट बद्दल डॉ राजेंद्र कुंभार व  संशोधन पेपर प्रकाशित केल्याबद्दल डॉ.  शिवराज निकम तसेच संशोधन, काॅपीराईट व पेटंट नोंदणीसाठी सहकारी प्राध्यापकांना प्रेरणा व प्रोत्साहन केल्याबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बापूसाहेब सावंत यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरॊबर त्यांनी इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले व समाधान व्यक्

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली एकाची हत्या....

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आज दुपारी एक अंतर्गत वादातून एका इसमाची त्याच्या ओळखीच्या इसमाने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात राहणार्‍या रब्बानी या इसमाची त्याच्याच एका ओळखीच्या इसमाने अंतर्गत वादातून हत्या केल्याची माहिती समजत असून या संदर्भात माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांचे पथक, गुन्हे अन्वेेषण शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी यामध्ये काही जणांना ताब्यात घेतले आहे. सदर हत्या का करण्यात आली याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई..

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह एका ढाब्यावर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता या संसर्गजन्य गंभीर रोगाचा प्रादुर्भाव होतो याची माहिती असताना देखील त्याची काळजी न घेतल्याबद्दल व शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून तसेच काही महिला वेटर यांचे विहित नोकरनामे नसताना देखील बारमध्ये आढळून आल्याने या ठिकाणी असलेले वेटर, महिला वेटर, बार मॅनेजर व इतर व्यक्ती असे मिळून 29 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोळखे गाव हद्दीतील आयकॉन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिरढोण येथे असलेल्या संग्राम ढाबा या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्र