खारघर : २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चा स्थापना दिवस आहे.म्हणून यादिवशी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर च्या एनएसएस विभागाने तीन उपक्रम पार पाडले.
कोविड-१९ आणि ताळेबंदी च्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता,याची जाणीव ठेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० वाजता आंगणवाडी सेविकांच्या हस्ते दोर कापून शिबिराची सुरुवात झाली. सकाळी १० ते २ यावेळेत शिबीर राबवण्यात आला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तदान शिबिरात अंगणवाडी सेविका उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. शिबिरात एकूण ३३ रक्तदात्यांनी उपस्थिती लावली.पण वय,वजन,कोरोना लस घेतलेली दिनांक, इ. निकषांच्या आधारे २० लोक रक्तदान करण्यास पात्र ठरले व त्यांनी रक्तदान केले.टाटा मेमोरियल रुग्णालय खारघर यांची रक्तपेढी आणि डॉक्टर व कर्मचारी यांनी सर्व वैद्यकीय कामकाज पाहिले,ज्यामुळे शिबिर यशस्वी होण्यास मदत झाली.या शिबिरासाठी राजे शिवाजी रहिवासी मंडळ, सेक्टर-१,कळंबोली यांनी सर्वोतोपरी सहाय्य केले.
तसेच या त्रिसूत्री उपक्रमाअंतर्गत कळंबोली मधील मूकबधिर मुलांच्या आंगणवाडीला भेट दिली.या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या,पुस्तकांचे वाटप केले.यापुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच तिसरा उपक्रम म्हणून स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.यामधे राजे शिवाजी रहिवासी सेवा मंडळाचे सार्वजनिक चौक आणि सभामंडप स्वच्छ केले.अशा पद्धतीने अतिशय उत्साहात आणि आनंदात सर्व स्वयंसेवकांनी एनएसएस दिवस साजरा केला.
आपले प्रत्येक कार्य हे समाजाच्या उपयोगी असले पाहिजे याची जाणीव एनएसएस आपल्या कृती आणि उपक्रमांतून करून देत असते.त्यामुळे महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थी राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवा हे गुण अंगिकारताना दिसतात.तसेच नियोजन,अंमलबजावणी, सुसुत्रता,व्यवस्थापन यांसारखी कौशल्ये देखील अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आत्मसात करतात.याच करिता महाविद्यालयीन जीवनात एनएसएस मध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे.
कोवीड-१९ चे सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करत कार्यक्रम पार पाडण्यात आला. या सर्व उपक्रमांसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ सुनीता पाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment