जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे पनवेलमध्ये आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियानातंर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. १८) करण्यात आले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते ०७ ऑक्टोबर २०२१ या काळात "सेवा व समर्पण अभियान' विविध कार्यक्रमांद्वारे साजरा होणार त्यानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा आणि पनवेल भाजपच्या वतीने 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व व जीवनावरील' आधारित तीन दिवसीय प्रदर्शनीचे ओरिअन मॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते सुनिल घरत, भाजपचे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, राजेश्री ववेकर, रुचिता लोंढे, वृषाली वाघमारे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओरिअन मॉलचे संचालक मनन परुळेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ, प्रसाद हनुमंते, आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव गरीब, वंचित, दलित, आदिवासी, मागास आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. अनेक दशकानंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज मोदी सरकार कडून ऐकले जात असून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सज्ज आहे. श्री. नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून ०७ ऑक्टोबर, २०२१ ला जनतेच्या आशिर्वादाने जनसेवक म्हणून २० वर्ष पूर्ण करत आहेत. ०७ ऑक्टोबर, २००१ ला गुजरातचे मुख्यमंत्री व २०१४ रोजी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान झाले. लोकशाहीत लोकनेता ही संधी फार कमी नेत्यांना मिळत असून नरेंद्र मोदी यांची निरंतर वाढणारी लोकप्रियता दर्शवत आहे. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनसेवक म्हणून २० वर्षे कार्यकाळ पूर्ण झाल्याचा सुखद योगायोग व आनंदी क्षण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. १७ सप्टेंबर ते ०७ ऑक्टोबर २०२१ या काळात "सेवा व समर्पण अभियान' अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, गरीब वस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळे वाटप, प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबीर, धान्य वाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदी सफाई अभियान, अशाचप्रकारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
कोट-
संपूर्ण जगात आपल्या भारत देशाचे नाव अभिमानाने उंचवण्याचे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशात विविध योजना अंमलात आणून देशाचा विकास करण्याचे काम ते करीत आहेत. जगात कोरोनाचे संकट जाळे आले, अनेक देश त्यात हतबल झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ उपाययोजना करत या संकटात देशासह जगाला आदर्श दिले. देशाला आत्मनिर्भर करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. काल १७ सप्टेंबरला अडीच कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून विश्वविक्रम झाला आहे, अशाप्रकारे देशाच्या विकासाचे अनेक विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत राहतील. देशाच्या विकासाच्या अनुषंगाने नवभारतच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला पाहिजे.
- आमदार प्रशांत ठाकूर
Comments
Post a Comment