पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे व गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय विविध दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे शिबीर आयोजित झाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती पण आता ती दूर झाली आहे, त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
शिबिरामध्ये मिळणार या सुविधा-
रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती.
शिबिरांचे ठिकाण-
०१) गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, खारघर- लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज.
०२) शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता, सुकापूर- लक्ष्मी पब्लिक स्कुल.
०३) शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता, कळंबोली- नवीन सुधागड हायस्कुल
०४) शुक्रवार दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता, आजिवली हायस्कुल
०५) शुक्रवार दिनांक ०८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता, कामोठे- सुषमा पाटील विद्यालय
०६) मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता, गव्हाण- छत्रपती शिवाजी हायस्कुल
हि लागणार कागदपत्रे -
उत्पनाचा दाखल्यासाठी-
विहित नमुन्यातील अर्ज पाच रुपये कोर्ट फी स्टॅम्पसह,
प्रतिज्ञापत्र- अर्जदार अज्ञान असल्यास वडील किंवा कुंटुंबातील सज्ञान व्यक्तीचे,
अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/ मागील वर्षाचे आयकर विवरण पत्र,
अर्जदार व्यावसायिक असल्यास मागील आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र,
अर्जदार शेतकरी असल्यास ८ अ व चालू तारखेचे उतारे,
तलाठी अहवाल
शिधावाटप पत्रिका
इतर पुरावे (विद्युत देयक/ दूरध्वनी देयक/ भाडे पावती)
जातीचा दाखल्यासाठी -
स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला
वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
रेशनिंग कार्ड
साधा प्रतिज्ञापत्र
आत्याचा/काकांचा/ मोठ्या भावाचा शाळेचा दाखला
तीन पासपोर्ट साईज फोटो
वय, अधिवास व डोमासाईल दाखल्यासाठी -
जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/ भाडे पावती
अर्जदार अज्ञान असल्यास वडिलांचा वय अधिवास दाखला
परराज्यातील जन्म असल्यास सलग १० वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा
शिधावाटप पत्रिका/ पासपोर्ट/ मतदार ओळखपत्र
प्रतिज्ञापत्र - अर्जदार अज्ञान असल्यास वडील किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीचे
रेशनकार्डसाठी - घरपट्टी व असेसमेंट, आधारकार्ड, तलाठी पंचनामा, तीन पासपोर्ट साईज फोटो
शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी -
रेशनकार्ड
पॅनकार्ड
जन्माचा दाखला
Comments
Post a Comment