Skip to main content

पिरामलतर्फे दिवाण हाउसिंग फायनान्सचे (डीएचएफएल) संपादन आणि विलिनीकरणासाठी मोबदला भरला


पनवेल-नवी मुंबई (प्रतिनिधी) पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडने आज दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) संपादन मोबदल्याचे पैसे भरून आर्थिक सेवा क्षेत्रात आयबीसी पद्धतीअंतर्गत पहिला यशस्वी ठराव पूर्ण केल्याचे जाहीर केले. मूल्याच्या बाबतीत हा व्यवहार आतापर्यंतचा सर्वात मोठा ठराव असून त्यामुळे या क्षेत्रातील संभाव्य ठरावांसाठी मापदंड प्रस्थापित झाला आहे.

 याप्रसंगी पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल म्हणाले, ‘या लक्षवेधी संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पैसे भरल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आपल्या देशातील वंचित व दुर्लक्षित ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणारा आघाडीचा, डिजिटल दृष्टीकोन असलेला, वैविध्यपूर्ण आर्थिक सेवा समूह बनण्याच्या आमच्या नियोजनाला चालना मिळाली आहे. दिवाळखोरीविषयक (इनसॉल्वहन्सी) ठाम नियम हे कोणत्याही आधुनिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. दिवाळखोरीशी संबंधित ऐतिहासिक सुधारणांमुळे अशाप्रकारचे गुंतागुंतीचे ठराव जास्त समग्र आणि वेळेत सोडवणे शक्य झाले आहे.

     पिरामल समूहाचे कार्यकारी संचालक आनंद पिरामल म्हणाले, यातून एकत्रितपणे ३०१ शाखा, २३३८ कर्मचारी आणि एक दशलक्ष आजीवन ग्राहकवर्ग तयार होईल. वेगाने विकसित होत असलेल्या परवडणाऱ्या गृह बांधणी क्षेत्रात आमच्या कंपनीचे वर्चस्व असेल. गेल्या दोन वर्षांत आम्ही यशस्वीपणे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म, आधुनिक अनालिटिक्स इंजिन आणि एआय/एमएल क्षमता तयार केल्या आहेत. या संपादनामुळे आम्हाला हे तंत्रज्ञान जास्त मोठ्या ग्राहकवर्गासाठी राबवता येणार आहे. नवी एकत्रित कंपनी भारतातील डिजिटल- फर्स्ट रिटेल कर्ज बाजारपेठेत आघाडीवर असेल

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत बाळाराम पाटील यांनी ३