Skip to main content

अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांची युनियन युनियनसाठी न चालविता एक सामाजिक संघटना म्हणून तीचे स्थान निर्माण केले-केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव


मुंबई दि. 25 : अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांची युनियन युनियनसाठी न चालविता एक सामाजिक संघटना म्हणून तीचे स्थान निर्माण केले, हे अण्णासाहेबांच्या महान कार्यातून सिध्द होते. माथाडी कायद्याच्या निर्मित्तीसाठी त्यांनी संघर्ष केला, एक चळवळ तयार करणे व ती संघर्षातून पुढे घेऊन जाण्याचे तसेच माथाडी कायदा निर्माण करण्याचे महत्वाचे काम अण्णासाहेबांनी केले, अशा या नेत्याच्या 88 व्या जयंती निमित्त मी त्यांना प्रणाम करतो असे भावपुर्ण उद्गार व प्रतिपादन केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंती निमित्त माथाडी कामगार भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या ऑनलाईन मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, असंघटित, असुरक्षित कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही केंद्र सरकारतर्फे "ई श्रम पोर्टल सुरु केले असून, या पोर्टलवर लाखो कामगारांनी आपली नोंद केली असून, नरेंद्र पाटील यांनीही आपल्या सर्व कामगारांची या "ई श्रम पोर्टलवर नोंद करावी अशी विनंतीही केली व आपल्या माथाडी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण आपल्या सहकार्याना घेऊन दिल्लीत या, आपल्या मागण्यांवर विस्तृत खुली चर्चा करून आपल्या कामगारांच्या समस्या नक्कीच सोडवू कारण कामगारांच्या सुरक्षित व सन्मानित जिवनाची व्यवस्था करणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे.

या मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेबांनी मराठा समाज व माथाडी कामगारांच्या जीवनाला दिशा दिली आणि त्यांचे जीवन उन्नत केले. गरीबीला, श्रमाला, बोजा उचलणा-या माथाडी कामगारांची चळवळ उभारुन त्यांना सन्मान मिळवून दिला, अशी ही अण्णासाहेबांची क्रांतीकारी चळवळ असून, आम्ही आमच्या सरकारच्या काळात माथाडी कामगारांसाठी सत्तेचे दार उघडं ठेवल होत आणि कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले. सत्तेत असतो तर उरलेले प्रश्नही सोडविले असते, तरी पुढच्या काळात हे काम नक्कीच करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली व ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री भेपेंद्रजींना मी गेल्या कित्येक वर्षापासून ओळखतो, त्यांच्याकडे समस्या सोडविण्याची हातोटी असून, ते निश्चितपणे केंद्राशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न नक्कीच सोडवतील याची मला खात्री आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्थाविक महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय श्रम मंत्री भेपेंद्र यादव हे प्रथमत: आमच्या मेळाव्यास उपस्थित राहिले, त्याचे मी आभार मानतो, त्यांनी माथाडी कामगारांच्या केंद्राशी संबंधित समस्या व मागण्या व मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. नरेंद्र पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आखत्यारीत असलेल्या विविध प्रश्नांची माहिती दिली व ते सोडविण्यासाठी उपस्थित मंत्री महोदय व मान्यवरांना आग्रह केला.

या मेळाव्यात बोलताना संघटनेचे नेते कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, माथाडी कायद्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी व तो कायदा देशपातळीवर गेला पाहिजे अशी मी यादवजी व त्यांच्या सरकारला विनंती करतो. तर इनकम टॅक्सच्या नवीन धोरणामुळे माथाडी मंडळे अडचणीत येणार असून, ही समस्या सोडविण्यासाठीही यादवजींनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री व आमदार गणेश नाईक म्हणाले की, अण्णासाहेबांचा कामगार चळवळीतला काळ हा मान सन्मानाचा नव्हता तर संघर्षाचा होता. त्यांनी संर्घषातून निर्माण केलेल्या माथाडी कायद्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी आताच्या सर्व नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक संघटनेचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले तर माथाडी कामगार नेते कार्याध्यक्ष, गुलाबराव जगताप यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास माजी मंत्री राज पुरोहित, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार संदिप नाईक, माजी खासदार संजीवजी नाईक, माजी महापौर सागर नाईक, संजय उपाध्याय, माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार भारतीताई पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, माथाडी हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील, बाजार समितीचे चेअरमन अशोक डक, व्यापारी प्रतिनिधी शंकरशेठ पिंगळे, संजय पानसरे, दिनेश विरा नगरसेविका शुंभागी पाटील, शशिकला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात माथाडी भूषण हा पुरस्कार देऊन मंडळातील जुन्या नोंदीत कामगारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...