पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'बाप्पा मोरया घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांच्या उपस्थितीत आज (दि. १८) येथे करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक १४, १८, १९ व २० मर्यादित हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना २५ हजार रुपयांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कोशिश फाऊंडेशनचे सदस्य चिन्मय समेळ, अयुब अकुला आदी उपस्थित होते.
दिड दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा -
प्रथम क्रमांक - आश्विनी खेडेकर आणि नेहा डोंगरे
द्वितीय क्रमांक - अक्षया चितळे
तृतीय क्रमांक - जगदिश गायकर
पाच दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा -
प्रथम क्रमांक - संदीप मारुती शेळके
द्वितीय क्रमांक - विक्रांत रानडे
तृतीय क्रमांक - अंजली महाजनी
दहा दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा -
प्रथम क्रमांक - साहित्या देशमाने
कोट-
गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हि स्पर्धा यापूर्वी प्रभाग १९ पर्यंत मर्यादित होती. मात्र अनेक नागरिकांच्या आलेल्या सूचनेनुसार या स्पर्धेचा विस्तार करण्यात आला. स्पर्धेला दरवर्षी उत्तरोत्तर उदंड प्रतिसाद मिळत आहे, त्या बद्दल सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक आभार.
- परेश ठाकूर, अध्यक्ष कोशिश फाऊंडेशन व सभागृहनेते पनवेल महानगरपालिका
Comments
Post a Comment