खारघर : फिट इंडिया अंतर्गत मॅरेथॉन च्या यशस्वी कार्यक्रमानंतर सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटने
योग आणि ध्यान सत्र आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.हा कार्यक्रम ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेण्यात आला.यासाठी डॉ. कुश पंचाल हे प्रशिक्षक लाभले असून यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक आणि महाविद्यालयाचे शिक्षक यांनी हजेरी लावली.
डॉ.कुश यांनी वेबिनारमधे, स्नायू मजबूत होतील आणि प्राणघातक व्हायरसशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल अशी आसने शिकवली.प्रत्येक व्यक्तीने आपले मानसिक आरोग्य जपायला पाहिजे याची जाणीव करून देणे हे या योग साधनेमागचे उद्दिष्ट होते.
सदर वेबिनार हे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागीय अधिकारी डॉ. सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.
डॉ. कुश पंचाल यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल विचारले असता ते एक आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी अमेरिकेतील फिटनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिप्लोमा केला आहे अशी माहिती मिळाली. पंचाल हे कंजन रनौत आणि शाहिद कपूरचे वैयक्तिक ट्रेनरदेखील आहेत.आशियातील ६६७ योग प्रशिक्षकांमधून, पहिल्या १६ व्या स्थानावर त्यांची निवड करण्यात आली असून ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कॉर्पोरेटमध्ये त्यांच्या योगा प्रशिक्षणासाठी किंमत मोजवी लागते, परंतु केवळ भारतीय विद्यार्थ्यांसाठी ते हे वेबिनार पूर्णतः मोफत करीत आहेत, हे प्रशंसनीय आहे.
Comments
Post a Comment