पनवेल : पनवेल पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना त्यामध्ये कक्ष सेवकांची पदभरती करून कोविड काळात सेवा देणाऱ्या मुलांना न्याय देण्यात यावा असे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पनवेल येथील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकांना 1 सप्टेंबर 2021 पासून कामावरून कमी करण्यात आले आहे. कोविड काळात सुरुवातीपासून कक्ष सेवकांनी रुग्णाची आणि हॉस्पिटलची अविरत सेवा केली आहे. अशा तरुण मुलांना कामावरून तडकाफडकी कमी केल्याने त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना कक्ष सेवकांची पदभरती करून कोविड काळात सेवा देणाऱ्या मुलांना न्याय द्यावा अशी मागणी प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment