पनवेल(प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व सातत्यपुर्ण प्रयत्नातून गाढी नदीवरील देवद - सुकापूर, नवीन पनवेल पुलाच्या कामाला व कार्यादेशाला मंजुरी मिळाली असून लवकरच या महत्वपूर्ण कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनपूर्ती केली आहे.
पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देवद ठिकाणी लोकवस्ती विकसित होत आहे. त्या अनुषंगाने वाढते नागरीकरण आणि वाहतूक यांचा विचार करता या गावात जाण्यासाठी गाढी नदीवरील असलेला पूल जीर्ण झाल्याने या ठिकाणी नवीन आणि रुंद पूल निर्माण करण्याची मागणी सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे करत सततचा पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी करतानाच या पुलाची आवश्यकता त्यांच्या लक्षात आणून दिली होती. आणि त्यानुसार या पुलाच्या कामासंदर्भात पत्रव्यवहार व बैठका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, एमएमआरडीए यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानुसार देवद पुलाच्या कामाला मंजुरी व कार्यादेश मिळाला आहे. या कामासाठी ११ कोटी ६७ लाख ०६ हजार ४४ रुपये खर्च येणार असून आरसीसी प्रकारचे हे काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश कार्यादेशानुसार ठेकेदाराला देण्यात आला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनपूर्ती करण्यात आल्याने देवद व परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी..
ReplyDeleteलोकसेवक, लोकनायक, जनसेवक म्हणजे
दमदार आमदार बाळाराम पाटील साहेब.💐👌👍
आता पनवेल चे विद्यमान आमदार काही सांगतील जनतेला..
पनवेल मध्ये TIPL च्या माध्यमातून भरपूर बँनरबाजी पण होईल.. परंतु गेल्या दहा वर्षांत ते ज्या पक्षात होते तेव्हा त्यांची राज्यात व केंद्रात दोन्ही ठिकाणी सत्ता होती.. सर्व महत्त्वाची खाती यांच्या पक्षाकडे होती.. हे स्वतः सिडको चे अध्यक्ष होते.
परंतु त्यांनी त्यावेळी तात्पुरत्या पुलाला व रस्त्याला किती विरोध केला होता हे त्या भागातील जनतेला माहिती आहे. त्या संबंधित पुलासाठी आपण कितीवेळा आवाज उठवला हे पण पनवेल च्या जनतेला माहिती आहे.
त्यामुळे आता आपण कितीही प्रयत्न केले श्रेय घेण्याचे तरी तो अधिकार आपल्याला नाही आता आमदार महोदय..
कारण आता सत्ता महाविकास आघाडी ची आहे..
आणि शेकापक्षाचे अभ्यासु, आक्रमक, कर्तव्यदक्ष,
कर्तबगार, दमदार आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी गेल्या अधिवेशनात पनवेल करांच्या देवद नवीन पनवेल, सुकापुर, विचुंबे, उसर्ली, शिवकर, मोहो, पर्यंत ये जा करणाऱ्या जनतेचा आवाज मंत्रालयात उठवला आणि या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे..
त्यामुळे आपण आपल्या रामप्रहरपेपरमध्ये किंवा मल्हार टीव्ही चँनेल वरुन थोडे दिवस बातमी चालू ठेवा..परंतु काम शेकापक्षाचे आहे हे जनतेला माहिती आहे..
सर्व सामान्यांचे नेतृत्व बाळुशेठ तुमच्या कार्याला लाल सलाम..💐👌👍🇦🇴💐💪🤝👑
खोटे श्रेय उपटण्याचे अतीमहान कार्य आता भाजपावाल्यांनी सोडून द्यावे. सत्तेवर असताना काहीच करता आले नाही, दुसर्यांच्या कामाचे श्रेय घ्यायचे आता सोडून द्यावे. भरपूर स्कोप आहे काम करायला तुम्हाला, पण ते करायचे सोडून आयत्यावर कोयता मारू नका.
ReplyDeleteदुसऱ्यांच्या कामा श्रेय घेण्यापेक्षा स्वतः कहीतरी नवीन कामे काढा किती दिवस आयत्या गाढी वर बसुन खाल , काय कामा नसतील सुचत तर ! ज्या ग्रामीण भागात फक्त निवडणूकीच्या वेळी येता त्या ग्रामीण भागातील रस्त्यावर लक्ष द्या
ReplyDelete