Skip to main content

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय आवश्यक विषय म्हणून घ्यावा - अखिल भारतीय योग शिक्षक महासंघांची मागणी


पनवेल(प्रतिनिधी) नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय हा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आवश्यक विषय म्हणून लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे असे निवेदन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना अखिल भारतीय योग शिक्षक  महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष बहिरा यांनी दिले.
          यावेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या संगिता पाटील, रायगड जिल्हा मिडीया प्रमुख गणेश कोळी, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य रघुनाथ बहिरा उपस्थित होते.
        या निवेदनात भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून योग अत्यंत महत्त्वपूर्ण विषय राहिलेला आहे. किंबहूना तो जीवनाचा अभिन्न भाग राहिलीला आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा योगाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे. मानवाला सर्वांगीण विकासासाठी योगा महत्त्वाचा विषय आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक तसेच अध्यात्मिक दृष्टीनेसुद्धा योगा महत्त्वपूर्ण भूमिका वटवू शकतो. शकतो. आपल्या प्राचीन धर्मग्रंथ जसे की, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद व अन्य सर्व ग्रंथांमध्ये योगाबद्दल विस्तृत चर्चा आहे. याचा विस्तृत परिचय समाजाला व्हावा म्हणून २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलून संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकंदर ९० दिवस चर्चा घडवून आणली व आज जगातील १४० देशांमध्ये योग शिक्षणाला मान्यता मिळालेली आहे. ही अत्यंत गौरव गौरवास्पद बाब आहे. अशा महत्त्वाच्या विषयाला आपल्या विकास कार्यक्रमांतर्गत भारतातील प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये योगाचे योग्य शिक्षण दिले जावे अशी अपेक्षा आहे.
             बाल्यावस्थेपासून विद्यार्थी जीवनामध्ये मुलांना जर योगाचे महत्व व मूल्य समजले तर या कच्च्या घड्यांना घडविताना देश अजून सक्षम होईल. अशी भूमिका भारतीय योग्य परिषदेने घेतली आहे तसेच शरीर स्वास्थ्यासाठी सुद्धा योग शिक्षण काळाची गरज आहे. बालकांच्या मनावर देशभक्तीचे सुसंस्कार करण्यासाठीसुद्धा योग शिक्षणाची आवश्यकता आहे. सध्याची स्थिती ही विद्यार्थी जीवनापासूनच सक्षम होण्यासाठी शारीरिक व मानसिक सुदृढता अत्यावश्यक आहे.
           मानसिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी सुद्धा योग शिक्षण काळाची गरज आहे यावर जोर दिल्यास देश सक्षम, निरोगी शकेल तसेच सर्व येणाऱ्या काळाची आव्हाने तो सहज व कुशलतेने हाताळू शकेल.
         ज्याप्रमाणे योग शिक्षणामुळे युजीसी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये लाखो बेरोजगार योग शिक्षक म्हणून रोजगार प्राप्त होईल तसेच अवैध्य पध्दतीने योग शिक्षण देणाऱ्या लोकांवर सुध्दा अंकुश येईल असे निवेदनात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.