पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या महानगरपालिका मुख्यालयात अद्ययावत पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने याकरिता प्रयत्न करणारे महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांचे आज (दि. ३०) पत्रकारांनी सदिच्छा भेट घेत आभार व्यक्त केले.
पनवेल महानगरपालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता लक्षातघेऊन नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक ४ सेक्टर १६,क्षेत्रफळ २००८६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडको कडून प्रात झाला आहे आणि या भूखंडाकरिता महापालिकेने २५ कोटी ५४ लाख ७२हजार ७०१ रुपये सिडकोला अदा केले असून सदर भूखंड पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे. या भव्य अशा इमारतीस ढोबळ खर्च २८० कोटी रुपये अपेक्षित आहे. या प्रस्तावित इमारतीत तळघर, तळमजला, सहा मजले व सहाव वरचा मजला, तसेच टेरेसवर आर्ट गॅलरी आणि अद्ययावत पत्रकार कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सभागृहनेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, साहिल रेळेकर, राज भंडारी, हरेश साठे, विशाल सावंत, असीम शेख, अनिल राय आदी उपस्थित होते.
कोट-
नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी व सुलभ कामकाजाकरिता पनवेल महानगरपालिकेचे सर्व सोयीसुविधांयुक्त मुख्यालय प्रत्यक्षात साकार होणार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्राला समाजामध्ये विशेष महत्व आहे. दररोज होणाऱ्या घडामोडी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पत्रकार एक समाजहित माध्यम आहे. त्यामुळे मुख्यालयात पत्रकार कक्ष असणे गरजेचे आहे आणि ती गरज या नवीन इमारतीत पूर्ण होणार आहे आणि त्याचा पत्रकारांना फायदा होणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी मौल्यवान मार्गदर्शन करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आभार. - सभागृहनेते परेश ठाकूर
Comments
Post a Comment