सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर चे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग नेहमीच समाज हिताचे आणि मदतीचे कार्य करत असते. असाच एक प्रयत्न १९ सप्टेंबर ला म्हणजेच अनंत चतुर्दशी ला केला.
गणपती विसर्जनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. कोरोना विषाणूचे संकट अजूनही टळलेले नसल्यामुळे या गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलिस प्रशासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. म्हणूनच एनएसएस स्वयंसेवकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरविले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी खारघर वाहतूक शाखा आणि कल्याण पोलिस विभागाला सहकार्य केले. खारघर मध्ये एकूण २९ स्वयंसेवक सहभागी झाले होते.यामध्ये ११ मुली आणि १८ मुले होते. प्रत्येकी १०-१० जणांचा समूह बनवून यांना बेलपाडा तलाव,खारघर तलाव आणि स्पायगॉट तलाव या ठिकाणांवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आले होते.यासाठी खारघर चे सहाय्यक पोलिस निरिक्षक आनंद चव्हाण साहेब आणि महिला पोलिस वारखडे मॅडम यांनी स्वयंसेवकांना गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल योग्य सूचना केल्या तसेच मार्गदर्शन केले.
याबरोबरच कल्याण मध्ये देखील ९ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.यात २ मुली आणि ७ मुले उपस्थित होते.यांनी दुर्गाडी किल्ला,गणेश घाट या परिसरात गर्दीचे व्यवस्थापन केले.तसेच कल्याण पश्चिम च्या परिसरात वाहनांच्या रहदारीचे नियोजन केले.कल्याण मध्ये पोलिस उपनिरीक्षक पाटील साहेब आणि सकुंडे साहेब यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांनी मुसळधार पाऊस पडत असताना देखील आपली जबाबदारी चोख बजावली.ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरळीत जीवनासाठी पोलिसांचे आणि इतर सरकारी विभागांचे किती मोलाचे योगदान आहे,हे समजले. पोलीस प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांना या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी देऊन,भावी पिढी घडविण्यासाठी चांगले पाऊल उचलले.यामुळे सर्व स्वयंसेवकांना विद्यार्थीदशेतच पोलिसांचे कार्य किती महत्त्वाचे, संवेदनशील आहे हे समजले.यापुढे विद्यार्थी गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन करतील आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील.
कोव्हीड-१९च्या नियमांचे पालन करुन सदर उपक्रम पार पाडल्याबद्दल पोलिसांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. सुनिता पाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
Comments
Post a Comment