Skip to main content

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेलमध्ये


पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ०१ वाजता पनवेलमध्ये  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

       खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर(सिकेटी) महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस तथा रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सेवा समर्पण अभियानचे प्रदेश प्रमुख राज पुरोहित, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

       या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनेतील लाभार्थींचा सन्मान, दिव्यांगांना मदत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना मदत, तसेच कुष्ठरुग्णांना धान्यवाटप केले जाणार आहे. 

      एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जनमानसात ओळख आहे. संपूर्ण जग हे भांडवलशाही आणि साम्यवादावर वादविवाद करत होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी तेव्हा याचा सूवर्णमध्य साधत एकात्म मानववाद मांडला. धर्म, अर्थ, काम मोक्षाकडे नेण्यासाठी असतात हा विचारही एकात्मवादात मांडला आहे. 'एकात्म मानववाद' ही विचारधारा रुजवण्यावर भर दिला. मोदी सरकारच्या योजना सारकारण्यामागेही एकात्म मानवतावाद आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बॅंक योजना, दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मुद्रा बॅंक योजना, मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास ही घोषणाही एकात्मवादाच्या विचारातून आली. ६० वर्षांपूर्वी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही तंतोतंत लागू पडते. अखंड समाजाचा विचार करणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे. सध्या देशात सुरू असलेल्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण कौशल्य योजना, मुद्रा बॅंक योजना आदी कल्याणकारी योजनांमागे मोदी सरकारचा नेमका सिद्धांत अंत्योदय, असाच आहे. त्यांचा आदर्श घेऊन भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या "सेवा व समर्पण अभियान' अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्यतपासणी शिबीर, गरीबवस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळेवाटप, प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबीर, धान्य वाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदी सफाई अभियान, अशाचप्रकारे विविध समाजोपयोगी उपक्रमराबविले जाणार आहेत, त्या अनुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाजपा व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र, बूथ अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.