Skip to main content

पाण्यात बुडणाऱ्याना पोलिसाने वाचविले.... पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकांची धाडसी कामगिरी


महेश पाटील यांना वरिष्ठांनाकडून कौतुकाची थाप

तक्का गणपती विसर्जन घाटावर घडली घटना

पनवेल,(प्रतिनिधी) -- 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला आहे. पनवेल परिसरात शनिवारी ता. 25 रोजी गौरा गणपतीचे दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरातील तक्का येथील गणपती विसर्जन घाटात गणपतीचे विसर्जन करण्याकरिता पाण्यात उतरलेल्या दोन व्यक्तींना पाण्यात अंदाज न आल्याने बुडत  होते. हि घटना लक्षात येताच पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पाटील यांनी जीवाची बाजी लावत त्या पाण्यात बुडणाऱ्याना वाचविले. या धाडसी कामगिरीमुळे पाटील यांना वरिष्ठांनी कौतुकाची थाप दिली आहे. खाकी वर्दीतील माणसाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांच्या संवेदनशीलतेची प्रत्यंतर आले.

अनंत चतुर्दशीला देशभरातील गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर अशी आर्त हाक देत साश्रू नयनांनी निरोप दिला. पनवेल तालुक्यातही लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. असे असले तरी भाद्रपदात येणाऱ्या संकष्ठ चतुर्थीला अनेक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गौरा गणपती बसवण्याची जुनी परंपरा आहे. या गणपतीला साखर चौथ गणपती असे संबोधले जाते. या गणपती बाप्पाचे शनिवारी ता. 25 रोजी उत्साहामध्ये  विसर्जन करण्यात आले. कोविड नियमांमुळे यंदा गणेश विसर्जनासाठी अनेक नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या चौकटीत राहून गर्दी टाळत यंदा विसर्जन पार पडला. तक्का विसर्जन घाटावर अत्यंत शिस्तबद्धपणे विसर्जन सुरू असतानाच येथील गणपती विसर्जन घाटावर विसर्जनाकरिता आलेले एक 50 वर्षीय तर दुसरा 25 वर्षीय व्यक्ती गणपती बाप्पा.. मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...असे म्हणत पाण्यात उतरले. व पुढे-पुढे जाऊ लागले. यावेळी ते दोघेही खोलवर पाण्यात गेल्याने पाण्यात बुडू लागले. वाचवा.. वाचवा आवाज ऐकताच त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस हवालदार पवार, महिला पोलीस दुधाळ यांनी मदत करीत त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस नाईक महेश पाटील, अशोक राठोड, नितीन वाघमारे हे पोलीस वाहनातून गस्त घालीत असताना बल्लाळेश्वर विसर्जन घाटावरून तक्का विसर्जन घाटावर पोहोचले. यावेळी हि घटना पाहातच काही क्षणातच संजय जोशी यांच्यासह पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्याठिकाणी अंधार असतानाही देखील पोलीस नाईक महेश पाटील यांनी जीवाची बाजी लावत या नदीतील खोलवर पाण्यात उडी मारून त्या बुडणाऱ्याना दोघा व्यक्तींना बाहेर काढले. व त्यांचे प्राण वाचविले. यामुळे महेश पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे तक्का येथील गणेशभक्त, रहिवाश्यानी पाटील यांना धन्यवाद देत आभार मानले. त्याचबरोबर या धाडसी कामगिरीमुळे वरिष्ठांनी देखील पाटील यांच्यावर कौतकाची थाप दिली आहे.

खाकी वर्दीवरील विश्वास आणखी घट्ट....

आधीच कोविड काळात हे खाकी वर्दीवाले करोना योद्धे आपले रक्षण करत आहेत. त्यात आता परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पाटील यांनी पुन्हा एकदा खाकीतल्या देवाचे दर्शन दिल्याने खाकी वर्दीवरील विश्वास आणखी घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.