नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची सिडकोकडे खारघर शहराच्या मध्यभागातून वाहणारे नाले बंदिस्त करणेबाबातची केली मागणी
खारघर : खारघर शहरातील उघडे नाले बंदिस्त करावते अशी लेखी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता (खारघर १) सिडको,खारघर यांच्याकडे केली आहे.त्यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिले की त्यांच्या प्रभागातील सेक्टर २० व २१ मधील जलवायु-विहार समोरील नाला उघडा असल्याकारणाने सदर नाल्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्याचबरोबर बरीच घाण,कचरा देखील मोठ्या प्रमाणात सदर नाल्यात ठिक-ठिकाणी झालेला आहे. सदर नाला हा उघडा असल्याकारणाने व तोच नाला पुढे शिल्प चौकातून ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलच्या समोरून पुढे जातो. त्यामुळे आजबाजूच्या सोसायटीतील रहिवाश्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त श्वास घ्यावा लागतो. पावसाळा सुरू असल्याकारणाने नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे व गवत देखील वाढलेले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असून परिसरात मलेरिया, डेंगू, थंडी-ताप इत्यादि आजरांचे रुग्ण वाढत आहेत. आपण सदर नाल्याची त्वरित साफ-सफाई करून सदर साथीच्या आजरांपासुन रहिवाश्यांची मुक्तता करावी. सदर नाला बंदिस्त करावा यासाठी परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली आहे. त्यांना वर्षानुवर्ष सदर उघड्या नाल्याचा त्रास होत आहे व दरवर्षी सदर ठिकाणी साचणार्या पाण्यामुळे नागरिक आजारी पडतात ते देखील कायमचे बंद होईल.तरी आपण रहिवाश्यांची मागणी लक्षात घेता सदर नाला बंदिस्त करावे अशी विनंती नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली
Comments
Post a Comment