खारघर : सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने विद्यालया अंर्तगत ६ सप्टेंबर यादिवशी फिट इंडिया मॅरेथॉन चे आयोजन केले होते. सध्या कोविड आणि ताळेबंदी मुळे
उद्याने, क्रीडांगणे, शाळा, कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य संतुलन बिघडले आहे.या परिस्थिती मध्ये मानसिक आरोग्यासोबतच शारिरीक आरोग्य राखणे अतिशय महत्त्वाचे आहे.याचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निरोगी जीवनासाठी आहारासोबतच योग्य व्यायाम आणि मैदानी खेळ खेळणे महत्वाचे आहेत,हे दर्शवण्यासाठी मॅरेथॉन चे आयोजन केले होते.सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर चे एनएसएस विभाग नेहमीच आपल्या उपक्रमातून कार्यातून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते.
महाविद्यालयाच्या आवारात सकाळी ७-८ यावेळेत हा उपक्रम राबवण्यात आला.मॅरेथॉनसाठी एकुण ३५ विद्यार्थी उपस्थित होते.त्यापैकी ३० जण मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले.विशेष म्हणजे यात २० मुले आणि १० मुलींनी आपला सहभाग नोंदवला आणि मॅरेथॉन पूर्ण केली.प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस पारितोषिक देण्यात आले
सध्या असे अनेक उपक्रम एनएसएस विभागामार्फत राबवले जात आहेत त्यांना विद्यार्थ्याचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या फिट मॅरेथॉनच्या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा देशमुख,एनएसएस विभागीय अधिकारी डॉ सुनीता पाल आणि महाविद्यालयाचे खेळाडू प्रशिक्षक जाधव सर उपस्थित होते.त्यासर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment