लग्नाचा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी 4 वर्ष्याच्या मुलाचे अपहरण...!तळोजा पोलीस हद्दीतील घटना... अवघ्या पाच तासात मुलाची सुखरूप सुटका, अपहरणकर्ता गजाआड
पनवेल प्रतिनिधी :- लग्नाचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी 25 वर्षीय युवकांनी प्रियसीच्या 4 वर्षीय भावाचे अपहरण केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेधर गावात घडली होती. या फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात तळोजा पोलिसांना यश आले आहे. तळोजा पोलिसांच्या पथकांनी अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळत चार वर्षीय मुलाची आरोपीच्या तावडीतून सुटका केली आहे.
मजीरुल मसुरीद्दीन हक्क वय 25 वर्षे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मजीरुल हक्क याने आपल्या लग्नाचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी, प्रेम जडलेल्या 23 वर्षीय युवतीच्या भावाचे अपहरण करून तो फरार झाला होता. तळोजा पोलिसांनी अवघ्या पाच तासात या आरोपीला अटक करून चार वर्षीय बालकांची सुखरूप सुटका केली आहे. मजिरूल हक्क वय 25 वर्ष हा आरोपी युवक तळोजा परिसरातील पेंधर गावातील रहिवाशी आहे. या 25 वर्षीय युवक राहत असलेल्या चाळीतील एका 23 वर्षीय युवती वर प्रेम जडले होते. हा आरोपी या युवतीच्या एवढा प्रेमात गुंतला होता की. आरोपी या युवती कडे वारंवार तू माझ्याशी लग्न कर असा अट्टहास करू लागला होता. या लग्नासाठी आरोपीने युवतीच्या घरी जाऊन युवतीच्या आई कडे लग्नाची मागणी देखील केली होती. मात्र मला हा मजरूल आवडत नसल्याचे सांगून युवतीने लग्नास नकार दिला होता. तसेच 7 जुलै रोजी ही युवती तळोजा एमआयडीसी परिसरता काम करत असलेल्या कंपनी च्या बाहेर जाऊन आरोपीने युवतीला पुन्हा लग्नाची मागणी केली होती. या वेळी देखील या युवतीने लग्नास नकार दिला होता. लग्नास नकार दिल्याने आरोपीने युवतीला मारहाण केली होती व मारहाण करताना तुझ्या चार वर्षीय भावाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या नुसार आरोपीने 17 सप्टेंबर रोजी चार वर्षीय बालकाचे त्याने अपहरण करून फरार झाला होता. फरार झाल्या नंतर, या 23 वर्षीय युवतीने तळोजा पोलीस स्टेशन गाठून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली , तक्रार दाखल झाल्या नंतर अवघ्या काही मिनिटाने तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासला सुरवात झाली या साठी विशेष पथके नेमण्यात आली आणि तपास सुरू केला हे पथक भिवंडी, कुर्ला, कल्याण , सी एस टी कडे रवाना करण्यात आली या वेळी तपास करत असताना आरोपी हा भिवंडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या वेळी भिवंडी येथे असलेल्या एस टी स्टॅण्ड परिसरात असलेल्या सहायक्का पोलीस निरीक्षक निकम या पथकांनी तपास करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या काही तासात फरार होण्याच्या तयारीत असताना निकम यांच्या पथकांनी आरोपीला अटक करून त्याच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बालकांची देखील सुटका केली आहे.
Comments
Post a Comment