Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली वचनपूर्ती ; गाढी नदीवरील देवद पुलाच्या कामाचा कार्यादेश

पनवेल(प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व सातत्यपुर्ण प्रयत्नातून गाढी नदीवरील देवद - सुकापूर, नवीन पनवेल पुलाच्या कामाला व कार्यादेशाला मंजुरी मिळाली असून लवकरच या महत्वपूर्ण कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनपूर्ती केली आहे.             पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देवद ठिकाणी लोकवस्ती विकसित होत आहे. त्या अनुषंगाने वाढते नागरीकरण आणि वाहतूक यांचा विचार करता या गावात जाण्यासाठी गाढी नदीवरील असलेला पूल जीर्ण झाल्याने या ठिकाणी नवीन आणि रुंद पूल निर्माण करण्याची मागणी सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे करत सततचा पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी करतानाच या पुलाची आवश्यकता त्यांच्या लक्षात आणून दिली होती. आणि त्यानुसार या पुलाच्या कामासंदर्भात पत्रव्यवहार व बैठका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, एमएमआरडीए यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानुसार देवद पुलाच्या कामाला मंजुरी व कार्यादेश मिळाला आहे. या कामास

सभागृहनेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी मानले आभार

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या महानगरपालिका मुख्यालयात अद्ययावत पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने याकरिता प्रयत्न करणारे महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांचे आज (दि. ३०) पत्रकारांनी सदिच्छा भेट घेत आभार व्यक्त केले.  पनवेल महानगरपालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता लक्षातघेऊन नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक ४ सेक्टर १६,क्षेत्रफळ २००८६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडको कडून प्रात झाला आहे आणि या भूखंडाकरिता महापालिकेने २५ कोटी ५४ लाख ७२हजार ७०१ रुपये सिडकोला अदा केले असून सदर भूखंड पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे.  या भव्य अशा इमारतीस ढोबळ खर्च २८० कोटी रुपये अपेक्षित आहे. या प्रस्तावित इमारतीत तळघर, तळमजला, सहा मजले व सहाव वरचा मजला, तसेच टेरेसवर आर्ट गॅलरी आणि अद्ययावत पत्रकार कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सभागृहनेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी,

लाईव्ह महाराष्ट्र 9 न्युज पोर्टलचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल (प्रतिनिधी) : काळाचे बदलते पावले ओळखून युवा पत्रकार रवींद्र गायकवाड यांनी "लाईव्ह महाराष्ट्र 9" या न्यूज पोर्टलची नव्याने सुरुवात केली आहे. या पोर्टलचे शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. ३०) करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून पनवेल, रायगड, नवी मुंबईसह राज्यातील विविध घडामोडी वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.        लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तसेच ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, दीपक महाडिक, पत्रकार केवल महाडिक, मयूर तांबडे, विशाल सावंत, सनीप कलोते, ओमकार महाडिक, दिपाली पारस्कर आदी पत्रकार उपस्थित होते.        माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे. इंटरनेटच्या जगात आता लाईव्ह आणि ऑनलाईनला प्रणालीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.  एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण जग दिसू लागले आहे. त्याप्रमाणे पत्रकारीता सुद्धा त्याचे वेध घेऊन काम करीत आहे. त्याच अनुषंगाने कोरोना महामारीमध्ये डिजिटल पत्रकारितासुद्धा नाग

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २९ :  राज्यात काही जिल्ह्यात  गेली दोन दिवस  अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची  सीईटी प्रवेश परीक्षा  जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.           सतत दोन दिवसांपासून राज्यात  अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.  यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

पिरामलतर्फे दिवाण हाउसिंग फायनान्सचे (डीएचएफएल) संपादन आणि विलिनीकरणासाठी मोबदला भरला

पनवेल-नवी मुंबई (प्रतिनिधी) पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडने आज दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) संपादन मोबदल्याचे पैसे भरून आर्थिक सेवा क्षेत्रात आयबीसी पद्धतीअंतर्गत पहिला यशस्वी ठराव पूर्ण केल्याचे जाहीर केले. मूल्याच्या बाबतीत हा व्यवहार आतापर्यंतचा सर्वात मोठा ठराव असून त्यामुळे या क्षेत्रातील संभाव्य ठरावांसाठी मापदंड प्रस्थापित झाला आहे.  याप्रसंगी पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल म्हणाले, ‘या लक्षवेधी संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पैसे भरल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आपल्या देशातील वंचित व दुर्लक्षित ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणारा आघाडीचा, डिजिटल दृष्टीकोन असलेला, वैविध्यपूर्ण आर्थिक सेवा समूह बनण्याच्या आमच्या नियोजनाला चालना मिळाली आहे. दिवाळखोरीविषयक (इनसॉल्वहन्सी) ठाम नियम हे कोणत्याही आधुनिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. दिवाळखोरीशी संबंधित ऐतिहासिक सुधारणांमुळे अशाप्रकारचे गुंतागुंतीचे ठराव जास्त समग्र आणि वेळेत सोडवणे शक्य झाले आहे.      पिरामल समूहाचे कार्यक

०२ ऑक्टोबरला पनवेलमध्ये गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबीर-केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची लाभणार उपस्थिती

पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबीर आयोजित करण्यात आला आहे.           खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या लसीकरणाचा लाभ युवतींनी घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे.          गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी ल

मिहीर परदेशीची आशिया बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

पनवेल(प्रतिनिधी) साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ' ओपन इंटरनॅशनल गेम्स २०२१' बॅडमिंटन स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन पुरुष खुल्या एकेरी गटातील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून सुवर्ण कामगिरी केली. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मिहीरचा सत्कार करण्यात आला.          नेपाळ येथील शान बँक्वेटमध्ये बॅडमिंटन आशिया स्पर्धेत २० वर्षीय मिहीर परदेशीने सरस कामगिरी करत सुवर्ण पदक पटकाविले. मिहीर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा टीवाय बीकॉमचा विद्यार्थी आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. या कामगिरीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत ब-हाटे, उपप्राचार्य एस. के. पाटील, क्रीडा शिक्षक विनोद नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिहीरचे अभिनंदन केले. 

एनएसएस च्या ५२ व्या स्थापना दिनी समाजकार्याची त्रिसूत्री!!

खारघर : २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चा स्थापना दिवस आहे.म्हणून यादिवशी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर च्या एनएसएस विभागाने तीन उपक्रम पार पाडले.        कोविड-१९ आणि ताळेबंदी च्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता,याची जाणीव ठेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० वाजता आंगणवाडी सेविकांच्या हस्ते दोर कापून शिबिराची सुरुवात झाली. सकाळी १० ते २ यावेळेत शिबीर राबवण्यात आला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तदान शिबिरात अंगणवाडी सेविका उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. शिबिरात एकूण ३३ रक्तदात्यांनी उपस्थिती लावली.पण वय,वजन,कोरोना लस घेतलेली दिनांक, इ. निकषांच्या आधारे २० लोक रक्तदान करण्यास पात्र ठरले व त्यांनी रक्तदान केले.टाटा मेमोरियल रुग्णालय खारघर यांची रक्तपेढी आणि डॉक्टर व कर्मचारी यांनी सर्व वैद्यकीय कामकाज पाहिले,ज्यामुळे शिबिर यशस्वी होण्यास मदत झाली.या शिबिरासाठी राजे शिवाजी रहिवासी मंडळ, सेक्टर-१,कळंबोली यांनी सर्वोतोपरी सहाय्य केले.    तसेच या त्रिसूत्री उपक्रमाअंतर्गत कळंबोली मधील मूकबधिर मुलांच्या आंगणवाडीला भेट दिली.या व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

पनवेल(प्रतिनिधी) काँग्रेसच्या काळात योजना बारगळायाच्या तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वने मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी आज (दि. २५) येथे केले.   सेवा व समर्पण अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होते.  या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सेवा व समर्पण महाराष्ट्र राज्य प्रमुख माजी आमदार राज के. पुरोहित, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार योगेश सागर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, संजय उपाध्याय, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महे

अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांची युनियन युनियनसाठी न चालविता एक सामाजिक संघटना म्हणून तीचे स्थान निर्माण केले-केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव

मुंबई दि. 25 : अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांची युनियन युनियनसाठी न चालविता एक सामाजिक संघटना म्हणून तीचे स्थान निर्माण केले, हे अण्णासाहेबांच्या महान कार्यातून सिध्द होते. माथाडी कायद्याच्या निर्मित्तीसाठी त्यांनी संघर्ष केला, एक चळवळ तयार करणे व ती संघर्षातून पुढे घेऊन जाण्याचे तसेच माथाडी कायदा निर्माण करण्याचे महत्वाचे काम अण्णासाहेबांनी केले, अशा या नेत्याच्या 88 व्या जयंती निमित्त मी त्यांना प्रणाम करतो असे भावपुर्ण उद्गार व प्रतिपादन केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंती निमित्त माथाडी कामगार भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या ऑनलाईन मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, असंघटित, असुरक्षित कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही केंद्र सरकारतर्फे "ई श्रम पोर्टल सुरु केले असून, या पोर्टलवर लाखो कामगारांनी आपली नोंद केली असून, नरेंद्र पाटील यांनीही आपल्या सर्व कामगारांची या "ई श्रम पोर्टलवर नोंद

पाण्यात बुडणाऱ्याना पोलिसाने वाचविले.... पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकांची धाडसी कामगिरी

महेश पाटील यांना वरिष्ठांनाकडून कौतुकाची थाप तक्का गणपती विसर्जन घाटावर घडली घटना पनवेल,(प्रतिनिधी) -- 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला आहे. पनवेल परिसरात शनिवारी ता. 25 रोजी गौरा गणपतीचे दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरातील तक्का येथील गणपती विसर्जन घाटात गणपतीचे विसर्जन करण्याकरिता पाण्यात उतरलेल्या दोन व्यक्तींना पाण्यात अंदाज न आल्याने बुडत  होते. हि घटना लक्षात येताच पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पाटील यांनी जीवाची बाजी लावत त्या पाण्यात बुडणाऱ्याना वाचविले. या धाडसी कामगिरीमुळे पाटील यांना वरिष्ठांनी कौतुकाची थाप दिली आहे. खाकी वर्दीतील माणसाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांच्या संवेदनशीलतेची प्रत्यंतर आले. अनंत चतुर्दशीला देशभरातील गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर अशी आर्त हाक देत साश्रू नयनांनी निरोप दिला. पनवेल तालुक्यातही लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. असे असले तरी भाद्रपदात येणाऱ

गणपती विसर्जन व्यवस्थापनेसाठी एन्एस्एस् युनिटची पोलीसांना मदत.

सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर चे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग नेहमीच समाज हिताचे आणि मदतीचे कार्य करत असते. असाच एक प्रयत्न १९ सप्टेंबर ला म्हणजेच अनंत चतुर्दशी ला केला.            गणपती विसर्जनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. कोरोना विषाणूचे संकट अजूनही टळलेले नसल्यामुळे या गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलिस प्रशासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. म्हणूनच एनएसएस स्वयंसेवकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरविले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी खारघर वाहतूक शाखा आणि कल्याण पोलिस विभागाला सहकार्य केले. खारघर मध्ये एकूण २९ स्वयंसेवक सहभागी झाले होते.यामध्ये ११ मुली आणि १८ मुले होते. प्रत्येकी १०-१० जणांचा समूह बनवून यांना बेलपाडा तलाव,खारघर तलाव आणि स्पायगॉट तलाव या ठिकाणांवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आले होते.यासाठी खारघर चे सहाय्यक पोलिस निरिक्षक आनंद चव्हाण साहेब आणि महिला पोलिस वारखडे मॅडम यांनी स्वयंसेवकांना गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल योग्य सूचना केल्या तसेच मार्गदर्शन केले.          याबरोबरच कल्याण मध्ये देखील ९ स्वयंसेवकां

एनएसएस युनिटचे महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आरोग्य शिबीराचे आयोजन

खारघर :सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, खारघर यांचा १७वा वर्धापनदिन नुकताच पार पडला. या दिवसाचे औचित्त्य साधत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.        निरोगी जीवनासाठी ज्याप्रकारे आहार आणि व्यायाम महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे नियमित शारीरिक तपासणी देखील महत्त्वाची असते. ह्या उद्देशाने आरोग्य शिबीरासारख्या जनहितार्थ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .          सदर उपक्रमासाठी युनिटने खारघरच्या 'एम्आयटीआर्' ह्या खासगी रुग्णालयाला भेट देऊन तेथील  कार्यकारी व्यवस्थापक डाॅ. सुरज गेडम यांच्याशी आरोग्य शिबीरावरील आपले विचार व्यक्त केले. रुग्णालयाच्या सोयीनुसार १ डाॅक्टर, ३ परिचारिका आणि १ मार्केटिंग प्रमुख यांचा या कार्यक्रमात समावेश होता. सकाळी १०.०० वाजता आरोग्य शिबीराची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मंजुषा देशमुख यांच्या तपासणी पासुन झाली. या तपासणीत रक्तदाब, मधुमेह, बी.एम.आय., आणि वैद्यकीय सल्ला इ. समाविष्ठ होते. आरोग्य शिबीरामध्ये करण्यात आलेली प्रत्येक तपासणी विनामूल्य (मोफत) होती. तसेच अतिरिक्त तपासणीसाठी

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेलमध्ये

पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ०१ वाजता पनवेलमध्ये  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.         खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर(सिकेटी) महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस तथा रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सेवा समर्पण अभियानचे प्रदेश प्रमुख राज पुरोहित, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.        या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनेतील लाभार्थींचा सन्मान, दिव्यांगांना मदत, कोरो

शासकीय नियम मोडणार्‍या बारवर कारवाया सुरू ; कोरोना प्रादुर्भाव वाढविणारे बार कायमस्वरुपी बंद करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी

पनवेल, दि.23 (संजय कदम) ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने पनवेलकरांनी हायसे घेतले असतानाच गेल्या 15 दिवसामध्ये बेकायदेशीररित्या व शासकीय नियम मोडून काही बार रात्री उशिरापर्यंत शासनाने दिलेल्या अटी व सुचनांचे पालन न करता सुरू असतात, अशा बारवर शासनाने कारवाई करून कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी तालुक्यातील कोन व तळोजा परिसरातील नागरिक करीत आहेत. तालुक्यातील कोन गावच्या हद्दीतील साई पॅलेस बारमध्ये शासनाने दिलेल्या कोविड 19 उपाय योजना 2020 मधील सुचनांचे पालन न करता त्याचे उल्लंघन करून तेथे गर्दी  जमवून त्यामुळे कोरोना विषाणू सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याची जाणीव असताना देखील हयगयीने व निष्काळजीपणे सदर बार सुरू ठेवून सदर बारमधील महिला वेटर या पुरुष ग्राहकांच्या समोर अश्‍लिल व बिर्भत्स वर्तन करीत असल्याचे माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.प्रशांत शिर्के, अविनाश पाळदे, पो.उप.भरत पाटील आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी एकूण 20 जणांवर त्यामध्ये कर्मचारी,

खारघर कॉलनी फोरम कडून पूर्वलक्षी आणि दुहेरी करप्रणालीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल-नगरसेविका सौ.लिना गरड

खारघर (प्रतिनिधी)-खारघर काॕलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल महानगरपालिकेतील भाजपाच्या बंडखोर नगरसेविका सौ.लिना गरड यांनी पत्रकार परिषद घेऊन वाढीव मालमत्ता कराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती पत्रकारांना  दिली.       पनवेल महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. सिडको कॉलनी एरियामध्ये जवळजवळ 25 प्रकारच्या सुविधा सिडको मार्फत दिल्या जात आहेत. सदरच्या सुविधा बाबत अडीच लाख मालमत्ताधारक सिडकोकडे सेवाशुल्क भरतात. यावर्षीही सिडकोची बिले प्राप्त झालेली आहेत.महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आज पर्यंत, सत्ताधारी आणि प्रशासनाकडून महानगरपालिकेतील 80 टक्के नागरिक म्हणजेच सिडको कॉलनी एरिया मध्ये राहणारे जवळजवळ अडीच लाख मालमताधारक यांच्या विभागांमध्ये काडीचाही विकास केलेला नाही.         असे असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेकडून अन्यायकारकपणे 1 ऑक्टोबर 2016 पासून मालमत्ता कर लावलेला आहे. मालमत्ता कर प्रणालीमध्ये अनेक प्रशासकीय चुका आहेत . सदरची बाब वारंवार सत्ताधारी आणि प्रशासनाच्या ध्यानात आणून दिलेली आहे. लेखी निवेदन दिलेले आहे. लीगल नोटीस दिल

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची सिडकोकडे खारघर शहराच्या मध्यभागातून वाहणारे नाले बंदिस्त करणेबाबातची केली मागणी

खारघर : खारघर शहरातील उघडे नाले बंदिस्त करावते अशी लेखी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता (खारघर १) सिडको,खारघर यांच्याकडे केली आहे.त्यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या  निदर्शनास आणून दिले की त्यांच्या प्रभागातील सेक्टर २० व २१ मधील जलवायु-विहार समोरील नाला उघडा असल्याकारणाने सदर नाल्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्याचबरोबर बरीच घाण,कचरा देखील मोठ्या प्रमाणात सदर नाल्यात ठिक-ठिकाणी झालेला आहे. सदर नाला हा उघडा असल्याकारणाने व तोच नाला पुढे शिल्प चौकातून ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलच्या समोरून पुढे जातो. त्यामुळे आजबाजूच्या सोसायटीतील रहिवाश्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त श्वास घ्यावा लागतो. पावसाळा सुरू असल्याकारणाने नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे व गवत देखील वाढलेले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असून परिसरात मलेरिया, डेंगू, थंडी-ताप इत्यादि आजरांचे रुग्ण वाढत आहेत. आपण सदर नाल्याची त्वरित साफ-सफाई करून सदर साथीच्या आजरांपासुन रहिवाश्यांची मुक्तता करावी. सदर नाला बंदिस्त करावा यासाठी परिसरातील नागर

लग्नाचा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी 4 वर्ष्याच्या मुलाचे अपहरण...!तळोजा पोलीस हद्दीतील घटना... अवघ्या पाच तासात मुलाची सुखरूप सुटका, अपहरणकर्ता गजाआड

पनवेल प्रतिनिधी :- लग्नाचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी 25 वर्षीय युवकांनी प्रियसीच्या 4 वर्षीय भावाचे अपहरण केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेधर गावात घडली होती. या फरार झालेल्या आरोपीच्या  मुसक्या आवळण्यात तळोजा पोलिसांना यश आले आहे. तळोजा पोलिसांच्या पथकांनी अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळत चार वर्षीय मुलाची आरोपीच्या तावडीतून सुटका केली आहे.     मजीरुल मसुरीद्दीन हक्क वय 25 वर्षे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मजीरुल हक्क याने आपल्या लग्नाचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी, प्रेम जडलेल्या 23 वर्षीय युवतीच्या भावाचे अपहरण करून तो फरार झाला होता. तळोजा पोलिसांनी अवघ्या पाच तासात या आरोपीला अटक करून चार वर्षीय बालकांची सुखरूप सुटका केली आहे. मजिरूल हक्क वय 25 वर्ष हा आरोपी युवक तळोजा परिसरातील पेंधर गावातील रहिवाशी आहे. या 25 वर्षीय युवक राहत असलेल्या चाळीतील एका 23 वर्षीय युवती वर प्रेम जडले होते. हा आरोपी या युवतीच्या एवढा प्रेमात गुंतला होता की. आरोपी  या युवती कडे वारंवार तू माझ्याशी लग्न कर असा अट्टहास करू लागला होता. या लग्नासाठी आरोपीने युवतीच्या घरी जा

नवी मुंबई महानगरपालिका- श्रीगणेशोत्सवात 3 विसर्जन दिवसांमधील 39 टन 915 किलो निर्माल्यावर नैसर्गिक खतनिर्मिती

10 सप्टेंबरपासून सुरू झालेला यावर्षीचा श्रीगणेशोत्सव कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर आंतरिक भक्तीभावाने शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार मागील वर्षीच्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांच्या संख्येत सर्वच विभागांमध्ये नागरिकांची मागणी लक्षात घेऊन 16 ने वाढ करीत यावर्षी  विभागवार 151 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केलेली आहे.       त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होऊन नये व भाविकांना त्यांच्या सोयीच्या वेळेत विसर्जन करता यावे याकरिता  nmmc.visarjanslots.com  हे विशेष पोर्टल कार्यान्वित करून 'ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी' सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा लाभ बाराशेहून अधिक नागरिकांनी घेत ही संकल्पना यशस्वी केलेली आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक जलस्त्रोत रक्षणाच्या दृष्टीकोनातून कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्याचे पर्यावरणपूरक चित्र दिसून आलेले आहे.       *नव

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहर सेक्टर-२१ येथील संदीप गोसावी यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला

खारघर (प्रतिनिधी)-   शनिवार दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल महानगर समन्वयक श्री. गुरुनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर शहर सेक्टर-२१ येथील संदीप गोसावी यांच्या सह शेकडो पुरुषांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या वेळी जिल्हाप्रमुख मा. शिरीष घरत साहेब यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. त्या प्रसंगी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते...!

नोंदणी न करता बेकायदेशीरपणे लहान मुलांसाठी निवासाची व्यवस्था ; खारघर मधील संस्थेविरुध्द गुन्हा दाखल..

पनवेल, दि. १८ (वार्ताहर) ः  खारघर मधील नई आशा (न्यू होप) चॅरिटेबल ट्रस्टने बालकल्याण विभागाकडे नोंदणी न करता बेकायदेशीररित्या लहान मुलांसाठी निवासाची व्यवस्था केल्याचे आढळून आल्याने रायगड जिल्हा बालसंरक्षण अधिकार्‍यांनी या संस्थेच्या ताब्यात असलेल्या 13 अल्पवयीन बालकांना खांदा कॉलनी येथील बालग्राम येथे स्थलांतरीत केले आहे. तसेच सदर संस्थेच्या अध्यक्षाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खारघर, सेक्टर-12 मधील अनुग्राम रोहाऊसमध्ये नई आशा (न्यू होप) चॅरिटेबल ट्रस्ट नावाची संस्था अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची तक्रार पुणे येथील राज्य महिला बालविकास विभागाकडे करण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथील राज्य बाल संरक्षण संस्थेचे सदस्य सचिव तथा राज्य महिला बाल विकास आयुक्तांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच संस्थेच्या कामकाजाची चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश रायगड जिल्हा महिला-बाल विकास अधिकारी आणि रायगड बाल कल्याण समितीला दिले होते. त्यानुसार रायगड जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सकपाळ, जिल्हा परिवीक्षा अधिकारी अशोक पाटील, रायगड जिल्हा महिलाबाल व

पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याकरिता खारघर, द्रोणागिरी आणि उलवे येथे काही कालावधीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

सिडको महामंडळाकडून खारघर, उलवे आणि द्रोणागिरी नोडमधील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या देखभालीच्या कामांसाठी दिनांक 19 सप्टेंबर 2021 पासून काही कालावधीसाठी दर आठवड्यातील ठराविक दिवशी संबंधित नोडमधील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.  याबाबतचे वेळापत्रक सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले असून, या वेळापत्रकानुसार द्रोणागिरी व मजीप्रा (जेएनपीटी) येथे दर रविवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, खारघर नोडमध्ये दर सोमवारी सकाळी 08.00 ते मंगळवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, उलवे नोडमध्ये दर मंगळवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते बुधवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व आदल्या दिवशी पुरेसा पाणी साठा करून सिडकोस सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. 

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरीपालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका) :-  अखेर तो दिवस आला…रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली… अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा, लेक्चर हॉल, कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.        लवकरच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रकिया सुरू होणार असून, रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  यावेळी केले. रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहणार नाही आणि त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड वेगाने मार्गक्रमण करताना दिसून येणार आहे.         पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 50

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे पनवेलमध्ये आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियानातंर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. १८) करण्यात आले.           भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते ०७ ऑक्टोबर २०२१ या काळात "सेवा व समर्पण अभियान' विविध कार्यक्रमांद्वारे साजरा होणार त्यानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा आणि पनवेल भाजपच्या वतीने 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व व जीवनावरील' आधारित तीन दिवसीय प्रदर्शनीचे ओरिअन मॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.           या प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते सुनिल घरत, भाजपचे शहर सरचिटणीस व नगर

घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'बाप्पा मोरया घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांच्या उपस्थितीत आज (दि. १८) येथे करण्यात आले.     गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक १४, १८, १९ व २० मर्यादित हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना २५ हजार रुपयांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.  यावेळी कोशिश फाऊंडेशनचे सदस्य चिन्मय समेळ, अयुब अकुला आदी उपस्थित होते.   दिड दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा - प्रथम क्रमांक - आश्विनी खेडेकर आणि नेहा डोंगरे  द्वितीय क्रमांक - अक्षया चितळे  तृतीय क्रमांक - जगदिश गायकर  पाच दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्ध

योग आणि ध्यान सत्रासाठी राष्ट्रीय सेवा योजना सरसावली

खारघर : फिट इंडिया अंतर्गत मॅरेथॉन च्या यशस्वी कार्यक्रमानंतर सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटने योग आणि ध्यान सत्र आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.हा कार्यक्रम ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेण्यात आला.यासाठी डॉ. कुश पंचाल हे प्रशिक्षक लाभले असून यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक आणि महाविद्यालयाचे शिक्षक यांनी हजेरी लावली.      डॉ.कुश यांनी वेबिनारमधे, स्नायू मजबूत होतील आणि प्राणघातक व्हायरसशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल अशी आसने शिकवली.प्रत्येक व्यक्तीने आपले मानसिक आरोग्य जपायला पाहिजे याची जाणीव करून देणे हे या योग साधनेमागचे उद्दिष्ट होते.      सदर वेबिनार हे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागीय अधिकारी डॉ. सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.       डॉ. कुश पंचाल यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल विचारले असता ते एक आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी अमेरिकेतील फिटनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिप्लोमा केला आहे अशी माहिती मिळाली. पंचाल हे  कंजन रनौत आणि शाह

ओबीसी समाजाचा विश्वासघात करण्याऱ्या ठाकरे सरकारचा निषेध

पनवेल (प्रतिनिधी) महाविकास आघाडी ठाकरे सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत नेहमीच उदासिनता दाखवली आणि समाजाचा नेहमीच विश्वासघात केला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या तिघाडी ठाकरे सरकारच्या विरोधात पनवेलमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली.           ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज (बुधवारी, दि. १५ सप्टेंबर) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.           पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामोठे तालुका मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, कर्जत मंडल तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, पनवेल म

शासकीय विविध दाखले शिबिरांचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे व गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय विविध दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.         रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे शिबीर आयोजित झाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती पण आता ती दूर झाली आहे, त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांन

सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विध्यार्थीचा निरोगी आरोग्यासाठी एक धाव

खारघर : सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने विद्यालया अंर्तगत ६ सप्टेंबर यादिवशी फिट इंडिया मॅरेथॉन चे आयोजन केले होते. सध्या कोविड आणि ताळेबंदी मुळे उद्याने, क्रीडांगणे, शाळा, कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य संतुलन बिघडले आहे.या परिस्थिती मध्ये मानसिक आरोग्यासोबतच शारिरीक आरोग्य राखणे अतिशय महत्त्वाचे आहे.याचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.        निरोगी जीवनासाठी आहारासोबतच योग्य व्यायाम आणि मैदानी खेळ खेळणे महत्वाचे आहेत,हे दर्शवण्यासाठी मॅरेथॉन चे आयोजन केले होते.सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर चे एनएसएस विभाग नेहमीच आपल्या उपक्रमातून कार्यातून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते.          महाविद्यालयाच्या आवारात सकाळी ७-८ यावेळेत हा उपक्रम राबवण्यात आला.मॅरेथॉनसाठी एकुण ३५ विद्यार्थी उपस्थित होते.त्यापैकी ३० जण मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले.विशेष म्हणजे यात २० मुले आणि १० मुलींनी आपला सहभाग नोंदवला आणि मॅरेथॉन पूर्ण केली.प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस पारि

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली रिक्षा चालकांना आर्थिक मदत

पनवेल दि.११ (वार्ताहर)- शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांनी खारघर शहरातील संतोष हरिश्चंद्र पवार यांचा कोरोना काळात बंद पडलेला रोजगार आर्थिक सहाय्य करून सुरू करून दिला. खारघर शहरातील संतोष हरिश्चंद्र पवार हे आपला रिक्षा चालवून उदर निर्वाह करत होते. परंतु मागील कोरोंना काळात त्यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन, आपली व्यथा मांडली. सध्याची परिस्थिती पाहता, विलंब न लावता जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आर्थिक सहाय्य करून, त्यांचा बंद पडलेला रीक्षा चा व्यवसाय पुनः सुरू करून दिला व शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक गुरूंनाथ पाटील, शाखाप्रमुख सचिन ठाकुर, गिरिष गुप्ता आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना कक्ष सेवकांची पदभरती करावी-विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे

पनवेल : पनवेल पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना त्यामध्ये कक्ष सेवकांची पदभरती करून कोविड काळात सेवा देणाऱ्या मुलांना न्याय देण्यात यावा असे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.          पनवेल येथील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकांना 1 सप्टेंबर 2021 पासून कामावरून कमी करण्यात आले आहे. कोविड काळात सुरुवातीपासून कक्ष सेवकांनी रुग्णाची आणि हॉस्पिटलची अविरत सेवा केली आहे. अशा तरुण मुलांना कामावरून तडकाफडकी कमी केल्याने त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना कक्ष सेवकांची पदभरती करून कोविड काळात सेवा देणाऱ्या मुलांना न्याय द्यावा अशी मागणी प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे.

वाकडी-दुंदरे रस्त्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी दुरूस्तीबाबत अधिकार्‍यांना सूचना

पनवेल( प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील वाकडी-दुंदरे रस्ता खराब झाला असल्याने त्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसह शनिवारी (दि. 4) पाहणी करून दुरूस्तीबाबत सूचना केल्या. सध्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनी स्वःखर्चाने येथील खड्डे भरणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे वाकडी-दुंदरे रस्ता खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आल्याने त्यांनी शनिवारी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच अनुसया वाघ, गुरूनाथ भोपी, राजेश भोपी, रमेश पाटील, नामदेव जमदाडे, किशोर पाटील, शांताराम चौधरी, कचर पाटील, बाळाराम भोपी आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता राठोड यांच्यासमवेत या रस्त्याची पाहणी केली.    आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून 2515 मधून वाकडी-दुंदरे या रस्त्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 30 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रस्त्याची अवस्था पाहून बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता राठोड यांना सूचना क

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय आवश्यक विषय म्हणून घ्यावा - अखिल भारतीय योग शिक्षक महासंघांची मागणी

पनवेल(प्रतिनिधी) नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय हा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आवश्यक विषय म्हणून लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे असे निवेदन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना अखिल भारतीय योग शिक्षक  महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष बहिरा यांनी दिले.           यावेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या संगिता पाटील, रायगड जिल्हा मिडीया प्रमुख गणेश कोळी, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य रघुनाथ बहिरा उपस्थित होते.         या निवेदनात भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून योग अत्यंत महत्त्वपूर्ण विषय राहिलेला आहे. किंबहूना तो जीवनाचा अभिन्न भाग राहिलीला आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा योगाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे. मानवाला सर्वांगीण विकासासाठी योगा महत्त्वाचा विषय आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक तसेच अध्यात्मिक दृष्टीनेसुद्धा योगा महत्त्वपूर्ण भूमिका वटवू शकतो. शकतो. आपल्या प्राचीन धर्मग्रंथ जसे की, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद व अन्य सर्व ग्रंथांमध्ये योगाबद्दल विस्तृत चर्चा आहे. या