Skip to main content

खारघरमध्ये सर्वधर्मीयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मा.मंत्री नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेशl

 



पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः मोदी सरकारवरचा लोकांचा विश्‍वास आता उडत चालला असून काँग्रेस पक्षच हा तळागळातील लोकांना न्याय देवू शकतो ही भावना सर्वांमध्ये आता एकवटली आहे त्यामुळेच आज खारघरमध्ये सर्वधर्मीयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांचे स्वागत करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कोकण प्रभारी, मा.मंत्री नसिम खान यांनी व्यक्त केले.

खारघर येथील अनेक जणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत मा.मंत्री नसिम खान यांच्यासह रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.सी.घरत, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे प्रदेशचे कमांडर कलावत, कार्याध्यक्ष सुदाम पाटील, बाबा कुलकर्णी, हिंदुराव कुलकर्णी, अमीर सय्यद, सुनील सावर्डेकर, ताहिर पटेल, आझाद भाई, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडीच्या निर्मला म्हात्रे, पनवेल शहराध्यक्ष लतिफ शेख, राकेश चव्हाण, माया अहिरे, शशिकला सिंह आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत रेमण्डजी, शिबू, वर्गीस यांच्यासह मोठ्या प्रमाणात विविध समाजातील बांधवांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेेळी बोलताना मा.मंत्री नसिम खान याांनी सांगितले की, खारघर हे बहुधर्मीय व बहुभाषिक शहर आहे. येथील समस्या या आमच्या समस्या असून या ठिकाणी महानगरपालिकेने लादलेला कर हा प्रश्‍न निकाली काढूच त्याचप्रमाणे भाजपची सत्ता यापुढे महानगरपालिकेवर येवू देणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, आगामी निवडणूक ही स्वबळावर लढायची आहे. त्या दृष्टीने लोकांमध्ये जावून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सुद्धा सांगितले की, आता परिवर्तनाची लाट येवू लागली आहे. महागाईला सर्वच जनता त्रस्त झाली असून मोदी सरकारने फक्त आश्‍वासने दिली व त्या बदल्यात गोरगरीब जनतेला अजून गरीब केले आहे. काँग्रेसचा इतिहास आहे. ती सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असते. आगामी काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तर यावेळी बोलताना रायगड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.सी.घरत यांनी सांगितले की, सत्तेत काँग्रेसला आणा व केंद्रातील चोरांना हटवा, यासाठी आम्ही सज्ज झालो असून आगामी निवडणूक ही जिंकायचीच या उद्देशाने कामाला लागायचे आहे. नसीम भाई हे नेहमीच पनवेलकरांच्या मदतीला येत असतात. यापुढे सुद्धा महाविकास आघाडीतर्फे जास्तीत जास्त निधी ते पनवेलसाठी आणून आपण सर्वांनी मिळून पनवेलमधील समस्या सोडवू व महानगरपालिकेवर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करू, यासाठी आपण एकसंघ राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.