पनवेल महापालिका नगरसेवक राजुशेठ सोनी व संघटनेचा कणा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हस्ते राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज मा. खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या पनवेल शहर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन अनोख्या पद्धतीने पार पडले. एरव्ही वरिष्ठांच्या हस्ते किंवा एखादा सेलिब्रेटी बोलावून उदघाटन केले जाते मात्र यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी संघटनेचा कणा असणाऱ्या व कोणताही कार्यक्रम असो मेहनत घेणाऱ्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पनवेलचे सुप्रसिद्ध नगरसवेक राजुशेठ सोनी यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. राजे प्रतिष्ठान प्रणित राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या कार्याची पद्धत आणि झंझावात पाहता अनेक तरुण-तरुणी , महिलावर्ग तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक राजे प्रतिष्ठानमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत यासर्वांच्या सोबतीने राजे प्रतिष्ठानचा एक वेगळाच दरारा संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या हृदयात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान कायम आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले महाराज यांची तरुणांसह सर्वच वर्गात असलेली क्रेज पाहता व पनवेल - रायगड येथील राजे प्रतिष्ठानतर्फे सुरु असलेले सामाजिक, राजकीय कार्य पाहता तरुणांचा कल राजे प्रतिष्ठानकडे वाढत चालला आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा महाडिक यांची काम करण्याची पद्धत व प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा स्वभाव यामुळे राजे प्रतिष्ठानने आज संपूर्ण रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली आहे.राजे प्रतिष्ठान ही एक सामाजिक संघटना असून सामाजिक प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा वाढता आलेख पाहता पनवेल तालुक्यात प्रत्येक गावोगावी तसेच शहरातील गल्लोगल्ली शाखा व जनसंपर्क टाकण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून दिवसेंदिवस राजे प्रतिष्ठानची ताकद पनवेल तालुक्यात वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. या जनसंपर्क कार्यालय उदघाटन सोहळ्यास नगरसेविका रुचिता लोंढे, उद्योजक रमणशेठ खुटले, जॉन्सन जॉर्ज, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सचिव डी. डी. गायकवाड, सहचिटणीस नवनाथ बाबा आहिरे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीराम जोशी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश ठाकूर, उपसचिव चेतनभाई कोळी, सयाजी भाऊ चव्हाण, महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष नूरजहाँ कुरेशी, ठाणे महिला जिल्हाध्यक्षा गीताताई वैती, उपाध्यक्षा हर्षलाताई म्हात्रे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा जस्मिन नजे, समाजसेविका आयेशा कुरेशी, गोवंडी विभागातील समाजसेवक आबूभाई शेख, अकबर अली अन्सारी, राहुल लोहकरे, मंदार देसाई यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका संघटक ओमकार महाडिक, तालुका अध्यक्ष कैलास रक्ताटे, तालुका कार्याध्यक्ष नितीन डोंगरदिवे, सचिव राकेश मोरे, सोशल मीडिया प्रमुख सनील कदम, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, नवीन पनवेल उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, प्रथमेश चौरासिया, लाडका राहुल यांच्यासह संघटनेचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधीकार्यांनी आपल्यावरील जबाबदारीचे आवाहन समजून त्याचे पालन करून जनतेशी सतत संपर्कात राहून प्रतिष्ठान वाढवावा असे मत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment