कोकणातील चिपळूण, महाड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत महापुराने हाहाकार माजवला आहे. पुराच्या पाण्याने कित्येकांची घरेदारे व दुकाने वाहून गेली आहेत. चहूबाजूंनी लोक शक्य तेवढी मदत करत आहेत. अन्नधान्य, औषधे, दैनंदिन जगण्यासाठी लागणाऱ्या बाबी, कपडे या विशिष्ट मदतीसह आर्थिक मदतही लागणार आहे. भाजपतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्याचे काम अव्याहत सुरूच आहे. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी पूरग्रस्त भागात जाऊन मदत करीतच आहेत. ५ ऑगस्ट या माझ्या वाढदिवशी हारतुरे, पुष्पगुच्छ, जाहिरात, बॅनर्स यावर खर्च करण्याऐवजी आपणही शक्य तेवढी मदत वा निधी जमा करून पूरग्रस्तांना मदत करावी आणि आपल्या परिचितांनाही सांगावे, ही नम्र विनंती. आपल्या शुभेच्छांच्या आधारावरच मी आज येथवर वाटचाल केली आहे.प्रत्यक्षात लवकर आपली भेट होईलच.
आपला कृपाभिलाषी,
प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल अध्यक्ष, उत्तर रायगड जिल्हा, भाजपा
Comments
Post a Comment