नवी मुंबई प्रतिनिधी: (संदीप जाधव) खारघर येथील टाटा हाॅस्पिटल मध्ये सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असलेले दीलीप नाखवा यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार टाटा हाॅस्पिटलचे कर्मचारी सत्यनारायण कांबळे यांनी खारघर पोलीस ठाण्यात केली आहे. माझा आणि माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात आहे. मायबाप सरकार आम्हाला न्याय द्या, अशी विनवणी श्री कांबळे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला केली आहे, दरम्यान न्यायासाठी सत्यनारायण कांबळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे धाव घेतली असुन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली आहे.सत्यनारायण कांबळे हे खारघर सेक्टर 21 येथील साईदीप सोसायटी येथील आपल्या कुटुंबासमवेत राहतात. श्री कांबळे हे खारघर येथील टाटा हाॅस्पिटल मध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते मात्र मागासवर्गीय असल्याने टाटा हाॅस्पिटलचे उपमुख्य सुरक्षा अधिकारी राजन चव्हाण यांच्याकडुन मला जातीवाचक वारंवार हिनवले जाते. मी ड्रायव्हर असुन मला लादी पुसण्यासाठी जाणिव पुर्वक राजन चव्हाण सांगत असल्याने श्री कांबळे यांचे म्हणणे आहे. मी टाटा हाॅस्पिटल प्रशासनाला तक्रार देखील केली आहे मात्र, मला न्याय मिळाला नाही, उलट राजन चव्हाण यांनी मला कामावरुन बडतर्फ केल्याचे कांबळे यांनी सांगितले. राजन चव्हाण यांच्या अन्याया विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे देखील कांबळे यांनी नमूद केले...
चव्हाण यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मी खारघर पोलीस ठाणे आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाचे उंबरठे झिझवीत असताना श्री चव्हाण यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले. 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दिलीप नाखवा नावाच्या सुरक्षा अधिका-याने घरी येवुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार श्री कांबळे यांनी खारघर पोलीसांकडे केली आहे. राजन चव्हाण यांच्या विरोधातील तक्रार मागे घे नाही तर वाईट परिणाम होतील अशी धमकी नाखवा याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. टाटा मेमोरियल संघटनेचे संचालक डॉ राजेंद्र बडवे हे राजन चव्हाण याला पाठीशी घालीत असल्याने या दोघांच्या सांगण्यावरून नाखवा याने माझ्या घरी येऊन धमकावल्याचे श्री कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान सत्यनारायण कांबळे यांचे कुटुंब या प्रकारामुळे भयभीत झाले आहे. खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करुन देखील अद्यापी गुन्हा दाखल झाला नसल्याने सत्यनारायण कांबळे यांनी आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे धाव घेतली आहे. सदर प्रकरणी कांबळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज्याचे पोलिस महासंचालक नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग नवी मुंबई पोलीस उपआयुक्त, नवी मुंबई सहाय्यक आयुक्त खारघर पोलीस यांच्याकडे केली आहे....
Comments
Post a Comment