Skip to main content

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा

 


नवी मुंबई : कोकणासह इतर भागात अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या आकस्मिक संकटात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने तत्परतेने मदतीचा हात पुढे करीत आवश्यक यंत्रसामुग्री, वाहने, जंतुनाशके, औषधे यासह महाड, चिपळूण, कोल्हापूर भागात मदतकार्य पथके व वैद्यकीय पथके रवाना केली होती. तेथील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी या पथकांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याची दखल तेथील सर्वसामान्य नागरिकांनी घेतलीच शिवाय शासकीय पातळीवरून तसेच लोकप्रतिनिधींकडूनही या पथकांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.


      चिपळूणमधील स्थानिक प्रशासनामार्फत मदतकार्य पथके पाठविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे याविषयीचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याकडे प्राप्त झाली. त्यास महापालिका आयुक्तांची  त्वरित मान्यता लाभली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार 2 व 3 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची 206 स्वयंसेवकांची दोन जम्बो मदतकार्य पथके प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली चिपळूणकडे रवाना झाली होती. त्यामध्ये सह स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन, स्वच्छता निरीक्षक श्री.मिलींद तांडेल, श्री.महेश महाडिक, श्री. मनिष सरकटे, श्री. संजय शेकडे, श्री. अरूण पाटील, श्री. भूषण सुतार, श्री. विजय चौधरी, सहा. अग्निशमन अधिकारी श्री. रोहन कोकाटे, अग्निशमन प्रणेता श्री. शैलेश जगताप, श्री. श्रीकांत सावंत यांच्यासह 206 स्वयंसेवक सहभागी होते. या पथकांसोबत 2 फायर टेंडर व 6 बसेस आणि 3 जीप आवश्यक उपकरणे, जंतुनाशके यांच्यासह पाठविण्यात आलेल्या होत्या.


      पूर ओसरल्यानंतरच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, चिखलाचे साम्राज्य, कच-याचे ढीग आणि कोलमडलेल्या नागरी सुविधा अशा अतिशय बिकट परिस्थितीत या पथकांकडे नेमून दिलेल्या 11 प्रभागांमधील स्वच्छतेचे काम या स्वयंसेवकांनी केलेच त्यासोबत तेथील स्थानिकांना धीर देत मानसिक उभारी देण्याचे कामही केले. स्वच्छता केल्यानंतर त्याठिकाणी जंतुनाशकाची फवारणीही करण्यात आली.


      या समर्पित भावनेने केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईसह ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्याचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांचा मदतकार्य पथकांचे नियंत्रक म्हणून मंत्रीमहोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.  


      इतरांच्या अडचणीच्या काळात मानवतेच्या दृष्टीने मदतीसाठी धावून जाणारी महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिकेची वेगळी ओळख या पूरपरिस्थितीमधील महाड, चिपळूण, कोल्हापूर भागीतील अथक मदतकार्याने पुन्हा अधोरेखीत झालेली आहे.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.