कौतुकास्पद! विद्यार्थी करणार पूरग्रस्तांना मदत
खारघर :सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यासाठी त्यांनी सर्व समाजाला मदतीचे आवाहन केले आहे.समाजाने देखील सढळ हाताने मदत करत उत्तम प्रतिसाद दिला आहे.पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पाण्याच्या बाटल्या,खाद्यतेल,तांदूळ,गहू, डाळी,साखर,मीठ,कडधान्ये,पोहे,चहा पावडर,हळद,कपडे, ओआरएस,औषधे,सॅनीटायझर, बिस्कीटे,दंतमंजन,मास्क, मॅगी,साबण,मेणबत्ती,फ्रुटी, आगपेटी,इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव केली आहे. तसेच मुले,मुली, पुरुष यांची कपडे,तसेच महिलांसाठी साड्या.याशिवाय टॉवेल, अंथरूण,शाली इत्यादी गोष्टी जमा करण्यात आल्या.
एखादा व्यक्ती स्वतः सामान पोहचवू शकत नसेल तर शक्य झाल्यास त्यांच्या जवळ राहणारा विद्यार्थी ते समान घेऊन महाविद्यालयात पोच करतो.तसेच अत्यावश्यक सामान देता येत नसेल तर रोख स्वरूपात देखील मदत करू शकतो.सर्व सामानाची जमवाजमव झाल्यानंतर विद्यार्थी स्वतः जाऊन पूरग्रस्त भागात गरजू लोकांना सामानाची वाटप करणार आहेत.अजून काही दिवस आपण मदत स्वरूपात जीवनावश्यक वस्तू देऊ शकता. सद्यस्थितीत मदत करणे हे आपले प्रतेकाचे आद्य कर्तव्य आहे.
 या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय स्वयंसेवक विभगागाने प्रोत्साहन दिले.यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.सुनीता पाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment