पनवेल दि.18 (वार्ताहर): तालुक्यातील देहरंग धरणाच्या दोधाणी नदीच्या पात्र परिसरात अवैद्धरित्या वाळू उत्कखनन करून वाळूचा साठा करण्यात येत असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर वाळू साठा ताब्यात घेण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरूद्ध पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पनवेल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैद्धरित्या वाळूचा उपसा व साठा करून त्याची विक्री शासनाचे नियम मोडून छुप्या पद्धतीने होत असल्याचे अनेक तक्रारी पनवेल तहसील कार्यालयात येत असतात. अशाच प्रकारे देहरंग धरणाच्या दोधाणी नदीच्या पात्र परिसरात अवैद्धरित्या वाळू उत्कखनन करून वाळूचा साठा करण्यात येत असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळताच त्याठिकाणी तलाठी पोलिस पाटील व इतर पथकांनी जाऊन तेथून दोन ते अडिच ब्रास वाळू ज्याची किंमत जवळपास 7 हजार 500 इतकी आहे. हि त्याठिकाणी मिळून आली आहे. त्यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरूद्ध पनवेल तालुका पोलिस ठाण्यात खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम 1957चे कलम 15 व 21 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment