बल्लारपूर/प्रतिनिधी: शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित 'पुरोगामी साहित्य संसद' च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बल्लारपूर शहराचे रहिवासी पत्रकार,कवी-साहित्यिक, नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी आणि राज्य कोअर कमिटीने केली आहे. पुरोगामी महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी , अंधश्रद्धेचे समूळ नष्ट करण्यासाठी पुरोगामी कवी , साहित्यिकांची हक्काची संसद निर्माण व्हावी यासाठी पुरोगामी साहित्य संसद नरेंद्र सोनारकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काम करणार आहे. सोनारकर यांनी गेली अनेक वर्षांपासून सामाजिक,सांस्कृतिक,साहित्यिक आंदोलनात सक्रिय भूमिका बजावून आपल्या लेखणीने अनिष्ट रूढी , समाजविघातक परंपरा , अंधश्रद्धा यावर प्रखर हल्ला चढविला आहे. परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांना पेरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. साहित्य समीक्षक,प्रखर वक्ता,पत्रकार,कवी, साहित्यिक नरेंद्र सोनारकर यांची साहित्य संसदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यान