Skip to main content

महाड, चिपळूण, कोल्हापूरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकांचे अथक मदतकार्य सुरू

 



नवी मुंबई : मागील आठवड्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. याठिकाणच्या जनजीवनाला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य व वैद्यकीय पथके तातडीने रवाना करण्यात आलेली आहेत. तेथे पोहचल्यानंतर तेथील स्थानिक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार महापालिका पथकांनी त्वरित मदतकार्याला सुरूवात केलेली आहे.


  महाड भागामध्ये 65 अधिकारी, स्वयंसेवकांची 2 मदतकार्य पथके तसेच कोल्हापूर भागात 40 जणांचे 1 मदतकार्य पथक तेथील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे काम करीत आहे. त्याचप्रमाणे 15 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेले एक वैद्यकीय पथक चिपळूण भागात तसेच 24 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेले दुसरे पथक महाड भागामध्ये आरोग्य तपासणी व जपणुकीचे काम समर्पित भावनेने करीत आहे.


अतिवृष्टीत जलप्रलय उसळल्याने या भागांमध्ये मोठ्या उंचीचे गाळाचे थर साचलेले असून कचराही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके तेथील स्थानिकांना धीर देत असून मातीचा गाळ साफ करून कचराही गोळा करीत आहेत. या पथकांक़डे टिकाव, फावडे, घमेली, कुदळ, पहार, काटा फावडे, कचरा भरण्यासाठी मोकळ्या गोणी, मास्क, हॅन्डग्लोव्ह्ज, गमबूट असे आवश्यक साहित्य असून कार्बोलिक पावडर, ब्लिचींग पावडर अशी जंतुनाशके आहेत. तसेच 1 जेसीबी, 4 टँकर, 3 मिनी टिपर व 2 डम्परही तेथील मदतकार्यासाठी पाठविण्यात आलेले आहेत. कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड व स्प्रेईंग पम्पस देण्यात आलेले आहेत.


      घरे व परिसरातील गाळ काढून झाल्यावर सफाई केल्यानंतर त्याठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत असून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सफाई झाल्यानंतर दुर्गंधी दूर व्हावी याकरिता रसायनांची फवारणीही केली जात आहे. जंतुनाशके स्प्रेईंगसाठी काही स्वयंसेवकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्राणीही मृत्यूमुखी पडलेले असून त्यांची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याचे कामही नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक करीत आहे.


      अशाच प्रकारे महानगरपालिकेच्या आरोग्य पथकांनीही चिपळूण व महाड येथील स्थानिक प्राधिकरणांनी नेमून दिलेल्या भागात जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणीला तसेच त्यांच्या औषधोपचाराला सुरूवात केलेली असून वैद्यकीय पथकांसोबत पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


      या सर्व पथकांसोबत तसेच महाड, चिपळूण, कोल्हापूर येथील स्थानिक शासकीय प्राधिकरणांसोबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यामार्फत मदतकार्य पथकांचे नोडल अधिकारी म्हणून नियमित समन्वय राखला जात असून त्यांना आवश्यक बाबींची पूर्तता त्वरित केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांच्या कामगिरीतून तेथील परिस्थिती सुस्थितीत आणण्यात तेथील स्थानिक प्रशासनाला महत्वाची मदत होत आहे.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.