श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, चांगू काना ठाकूर महाविद्यालय, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सच्या वतीने महाडसाठी मदत रवाना
पनवेल(प्रतिनिधी) महाडकरांवर आलेल्या अस्मानी संकटात तेथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय(स्वायत्त), रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक अन्नधान्य किट तसेच इतर साहित्य आज (दि. २७) सकाळी महाडला रवाना झाले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजोपयोगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय(स्वायत्त), खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएसच्यावतीने महाड येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून ४५० अन्नधान्य किट, बेबी फुड, मेडिकल किट, कपडे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक किट आदी साहित्य महाडला पाठविण्यात आले.
यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे, उपप्राचार्य एस. के. पाटील, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्रभारी प्राचार्य निलेश कोळी उपस्थित होते. खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालय येथून सदर साहित्यांचे वाहन घेऊन एनएसएसचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत तरकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, प्रा. आकाश पाटील व एनएसएसचे स्वयंसेवकांची टीम महाडला मदतकार्य करण्यासाठी रवाना झाली
Comments
Post a Comment