Skip to main content

कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येणा-या कामांना अधिक गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

 


कोव्हीडच्या जागतिक स्थितीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत नियमितपणे लक्ष ठेवले जात असून सध्या इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया अशा देशांमध्ये व युकेमध्ये कोव्हीड वाढीची तीव्रता अधिक आहे तसेच जपानमध्ये तर चौथी लाट सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या पूर्वतयारीला नियोजनबध्द सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने करण्यात येणा-या कोव्हीड सुविधा निर्मिती कामांची तसेच त्याठिकाणी पूरक साहित्य उपलब्धतेबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आयुक्तांमार्फत नियमित आढावा घेतला जात असून याविषयी विशेष बैठक घेत आयुक्तांनी सर्वच कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.


       याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.         


       कोव्हीडच्या दुस-या लाटेत रूग्ण गंभीर होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवली होती. हा अनुभव लक्षात घेता महानगरपालिकेच्या नेरूळ व ऐरोली रूग्णालयांचे कोव्हीड रूग्णालयात रूपांतरण करण्यात येत असून त्याठिकाणी वरील 3 मजल्यांची स्थापत्य आणि विद्युत विषयक कामे 5 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत व नंतर खालील मजल्यांची कामे त्वरित सुरू करावीत असे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.


       ही कामे सुरू असतानाच आरोग्य विभागाने सर्जिकल साहित्य, आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून विहित वेळेत सुविधा सुरू करता येतील असे आयुक्तांनी निर्देशित केले


       याशिवाय ऑक्सिजन बेड्समध्येही 1200 बेड्सची वाढ करण्यात येत असून त्यासाठीची ऑक्सिजन पाईपलाईन व्यवस्थेची कार्यवाही जलद पूर्ण करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे रूग्णवाहिकांच्या संख्येतही 100 इतकी वाढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.


       संभाव्य तिस-या लाटेमध्ये कोरानो बाधितांमध्ये मुलांची संख्या मोठी असणार अशी शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असून त्यादृष्टीने ऐरोली व नेरूळ येथील दोन्ही नियोजित कोव्हीड रूग्णालयांमध्ये प्रत्येकी 200 पैकी 80 आयसीयू बेड्स हे पेडियाट्रिक म्हणून  निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे त्या दोन्ही रूग्णालयात महिलांसाठी प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात कोव्हीड वॉर्ड निर्माण करण्यात येत असून त्याचीही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जलद कोव्हीड निदान होण्यासाठी आवश्यक ट्रू नॅट मशीन्सही घेतल्या जात असून त्याची कार्यवाहीदेखील जलद करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले.  


      याशिवाय इतरही नव्याने सुरू करावयाच्या कोव्हीड आरोग्य सुविधा निर्मिती कामाला तसेच नॉ़न कोव्हीड सुविधा कामांना गती देण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले.


       दुस-या लाटेमध्ये सार्वत्रिकरित्या जाणवलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत आयुक्तांनी सुरूवातीपासूनच अधिक सतर्कता बाळगलेली असून वाशी सार्वजनिक रूग्णालयात कार्यान्वित पीएसए प्रकल्पानंतरचे इतरही 5 प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने अधिक जलद कार्यवाही करावी तसेच त्या बरोबरीनेच ऑक्सिजन स्टोरेज टँकबाबतही तत्पर कार्यवाही करण्यात यावी  असे आयुक्तांनी निर्देशित केले. यासोबतच 200 ड्युरा सिलेंडर आणि 250 जम्बो सिलेंडर उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश देण्यात आले.


       तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून त्याकरिता आवश्यक कार्यवाहीचा नियमित आढावा आयुक्तांमार्फत घेतला जात आहे. याशिवाय दैनंदिन रूग्णस्थितीबाबत व महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत दररोज सायंकाळी 7 वा. स्वत: आयुक्त सर्व महापालिका रूग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व विभाग अधिकारी यांचेशी वेबसंवादाव्दारे चर्चा करीत असून त्यानुसार कोव्हीड प्रतिबंधासाठी करण्यात येणा-या कार्यप्रणालीची दिशा ठरविली जात आहे व त्यामध्ये पूरक बदल करण्यात येत आहेत..


         कोव्हीडची तिसरी लाट जितकी लांबविता येईल तितका अधिक कालावधी आपल्याला लसीकरणाव्दारे नागरिकांना संरक्षित करण्यासाठी व कोव्हीड सुविधा निर्मिती करण्यासाठी मिळणार आहे. यादृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्याच्या उपाययोजनांचा एक महत्वाचा भाग म्हणून सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. ज्यामध्ये एखाद्या इमारतीत एक कोव्हीड बाधीत रूग्ण आढळला तरी त्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे टेस्टींग करण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांची वेळेत चाचणी होऊन त्यामध्ये कोणी कोव्हीड पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचे वेळेत निदान होईल आणि त्याच्यापासून होणारी संक्रमणाची साखळी खंडीत होईल. त्यामुळे नागरिकांनी या टारगेटेड टेस्टींग उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर, चेह-याला हात न लावणे, सतत हात धुणे अशा कोव्हीडपासून बचावाच्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींची सवय लावून घ्यावी असे आवाहन केले आहे.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.