पनवेल दि.28 (वार्ताहर)- खारघर येथील पांडव कडा किंवा त्यांच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये पावसाळ्यात फिरायला जाने यासाठी पोलीस यंत्रनेकडून पूर्णता बंदी आहे.खारघरची लोकसंख्या जवळपास पाच लाखाच्या आसपास आहे.शिवाय या ठिकाणी खारघर लगत असणाऱ्या शहरामधुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. बंदी असल्यामुळे पोलीसानच्या बरोबर नेहमी वादविवाद होतात.काही लोक अतिशय धोकादायक मार्गाने डोगर किंवा वाहत्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.अश्या प्रकारामुळे पांडव कड़ा येथे १६ लोकांचा मृत्यु झाला आहे.
दिनांक १८/७/२१ रोजी खारघर सेक्टर ५ (गोल्फ कोर्स) येथील डोंगरावर ११८ लोक फसले आहेत.अशी माहिती खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शत्रुघ्न माळी यांना प्राप्त झाली.त्यांनी क्षणाची विलंब न करता आपले सहकारी आणि अग्निशामकचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांना घेऊन स्वतचा जीव धोक्यात घालून या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढले. या कामाचे कौतुक खारघर वासियाने केले. या कामाचे नक्कीच कौतुक व्हावे यासाठी ईश फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कीर्ती मेहरा यांनी जीवन तारणहार पुरस्कार , वास्तविक नायक ( Life Saviour Award Real Hero) या नावाने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. याप्रसंगी ईश फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कीर्ती मेहरा व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते सर्वाना सन्मान पत्र दिले. त्याप्रसंगी संकल्प प्रतिष्ठान खारघर चे सरचिटणीस अजय माळी, ईश फाउंडेशनचे सुनील सचदेवा ,पिंकी शर्मा, अनुज मित्तल, हरिंदर सिंग मान , दिव्या मेहरा, दिलीप भाई जेना, खारघरचे समाजसेवक संतोष तांबोळी, ईश फाऊंडेशनच्या खजिनदार आरती मेहरा , हेमंत म्हात्रे, हरिंदर सिंग उपस्थित होते.
Comments
Post a Comment