खारघर(प्रतिनिधी)- *एक हात मदतीचा* नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महाड येथे आलेल्या आपत्तीग्रस्त भागात मदत करण्यासाठी प्रभागातील रहिवाश्यांना आवाहन केल्यानंतर लगेच आज दुपारपर्यंत मोठया प्रमाणात कपडे, साड्या, सॅनिटरी नॅपकीन तसेच बिस्किट पाकिटे लोकसहभागातून जमा करण्यात आले. सदर सर्व वस्तू या पनवेल येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे जमा करून त्यांचे वर्गीकरण करून उद्या ते महाड येथे भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर व सहकारी यांच्यामार्फत गरजूंना पोहोचवण्यात येतील.
Comments
Post a Comment