महाड( प्रतिनिधी) पुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारपासून (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. यामध्ये महाडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व काही भिजून, वाहून गेले असल्याने दोन वेळची भूक कशी भागवावी याही विवंचनेत ते आहेत. हे ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग दुसर्या दिवशीही महाडचा दौरा केला आणि तेथील नागरिकांना तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. गुरुकुल शाळेत हा मदतीचा कॅम्प लावण्यात आला आहे, तसेच नागरिकांच्या घरातील आणि व्यापार्यांच्या दुकानातील चिखल काढण्यासाठी दोन टँकर अहोरात्र फिरत आहेत. या वेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, युवा नेते वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस बिपीन महामुणकर, राजेश मपारा, अक्षय ताडफळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment