पनवेल(प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधून शक्य होईल ती सर्व मदत केली जात आहे. याच सेवाकार्यात योगदान देत भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या वतीने मंगळवारी (दि. २७) महाडमधील महिलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत व्हावी यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर यात योगदान देण्याचे आवाहन नागरिकांनाही करण्यात आले आहे. त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जमा झालेली मदत महाडमध्ये जाऊन पूरग्रस्तांना केली जात आहे. या काळात पूरग्रस्त महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः त्यांना कपड्यांचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलतर्फे विविध प्रकारची वस्त्रे, तसेच सॅनिटरी नॅपकिन जमा करून हे सर्व महाड येथे जाऊन महिलावर्गास देण्यात आले.
या वेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, आदिती मराठे, मनिषा चिल्ले, सपना पाटील, रायगड आत्मनिर्भर भारतच्या संयोजक नूतन पाटील, युवा मोर्चा शहर चिटणीस कोमल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment