राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची मालधक्का परिसरातील महिलांसोबत बैठक संपन्न. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत मालधक्कामधील महिलांचा प्रवेश
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल परिसरातील मालधक्का येथील महिलांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या बैठकीत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस डी. डी. गायकवाड यांनी झोपडपट्टी धारकांना एसआरए, सरकारी आरोग्य विमा, अपघात विमा, मुलांचे भवितव्य व शिक्षण कसे करून घेता येईल यावर मार्गदर्शन केले व लवकरच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे परिसरात लवकरच याबाबत जनजागृती करण्यासाठी शिबीर आयोजित केला जाणार असल्याचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व सहचिटणीस केवल महाडिक यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे महिलांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी. डी. गायकवाड, सहचिटणीस केवल महाडिक, तालुका संघटक प्रमुख ओमकार महाडिक, समाजसेविका आयेशा कुरेशी, जस्मिन नझे, आयुब शेख, हसीना शेख, संगीता मुंगशे, राबिया शेख यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपास्थित होते.
Comments
Post a Comment