Skip to main content

आता कोव्हीड लसीकरणाविषयीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध

 https://www.nmmccovidcare.com या विशेष पोर्टलवर सुविधा*



संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हीड लसीकरणाव्दारे संरक्षित करण्याकडे नवी मुंबई महानगरपलिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुलभपणे लसीकरण करून घेता यावे याकरिता महापालिका क्षेत्रात सध्या 2 ड्राईव्ह इन केंद्रांसह 78 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून अधिक लस साठा उपलब्ध झाल्यास लसीकरणाला गती देण्याच्या दृष्टीने शंभराहून अधिक लसीकरण केंद्रे लगेच कार्यान्वित करण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

      सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत असून दुस-या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणा-या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांव्दारे तसेच व्हॉट्स अपव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्द करण्यात येत आहे.

      याशिवाय *नागरिकांना लसीकरणाविषयीची माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी अशा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmccovidcare.com या विशेष पोर्टलवर कोव्हीड 19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.*

      *आता नागरिक https://www.nmmccovidcare.com या वेबसाईटवरील COVID-19 VACCINATION या सेक्शनवर क्लिक करून महानगरपालिकच्या कोणत्या लसीकरण केंद्रांवर, कोणत्या लसीचे, किती डोस, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या वेळेत उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात व त्यानुसार आपल्या लसीकरणाचे नियोजन करू शकतात.*

      *विशेष म्हणजे नागरिकांनी निवडलेल्या लस उपलब्ध असलेल्या त्यांच्या नजिकच्या लसीकरण केंद्रांवर सहज पोहचता यावे याकरिता लसीकरण केंद्राचा पत्तादेखील या पोर्टलवर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गुगल मॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.*

      *दररोज संध्याकाळी 7 वा. दुस-या दिवशीच्या लसीकरण सत्राची माहिती या विशेष पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार असून नागरिक पोर्टलला भेट देऊन त्यानुसार आपल्या लसीकरणाचे सुलभपणे नियोजन करू शकतात.*

      या https://www.nmmccovidcare.com पोर्टलवरून यापूर्वीच महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्टींग केंद्रांवर केलेल्या कोव्हीड टेस्ट्सचा रिपोर्ट COVID-19 TEST REPORTS सेक्शनमध्ये सहजपणे उपलब्ध होण्याची व्यवस्था केलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

      त्याच https://www.nmmccovidcare.com पोर्टलवर आता दररोजच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती एका क्लिकव्दारे समजणार असल्याने नागरिकांना हे अत्यंत सुविधाजनक होणार आहे. नागरिक अगदी आपल्या हातातील मोबाईलवरूनही लसीकरणाविषयीची माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात.  

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुलभपणे व गतीमानतेने लसीकरण व्हावे याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून लस खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात लस उपलब्ध होतील त्यानुसार कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीचे ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड व्यक्ती, ४५ वर्षावरील नागरिक यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. त्यासोबतच ज्यांचा दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संपर्क येतो असे मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, सोसायटी वॉचमन, पेट्रोल पंपवरील कर्मचारी अशा पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. याशिवाय बेघर निराधार व्यक्ती, रेडलाईट एरिआ, दुर्गम कॉरी क्षेत्र येथील दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाकडेही लक्ष देण्यात आलेले आहे.

      *आत्तापर्यंत 6 लक्ष 22 हजार 407 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 1 लक्ष 70 हजार 417 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. अशाप्रकारे एकूण 7 लक्ष 92 हजार 824 इतके कोव्हीड लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.*  

      *जास्तीत जास्त नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट असून नागरिकांना लसीकरणाची माहिती विनासायास सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध सुविधा निर्माण करीत महानगरपालिका प्रयत्नशील आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी https://www.nmmccovidcare.com या पोर्टलवरील COVID-19 VACCINATION या सेक्शनमध्ये जाऊन कोव्हीड लसीकरणाची अद्ययावत माहिती जाणून घ्यावी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.