नवी मुंबई प्रतिनिधी (संदीप जाधव) :खारघर सेक्टर 21 प्लाॅट क्रमांक 13 येथे चोरी, सिडकोने वरील ठीकाणी जेष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद बांधुन दिलेले आहे. सदर विरंगुळा केंदाचा वापर भजन, हरिपाठ, योगा, आचार्य अत्रे ग्रंथालय व वाचनासाठी केला जातो. तसेच मेडिकल कॅम्प भरवले जातात. लाॅकडाउनमुळे जेष्ठ नागरिकांचे कार्यक्रम सध्या बंद आहेत. तसेच विद्यार्थी त्याचा अभ्यासिका म्हणुन वापर करीत आहेत. आचार्य अत्रे उद्य्यानाच्या दोन्ही गेट 24 तास उघडे असतात. उद्यानासाठी व विरंगुळा केंदासाठी सिक्युरिटी वाॅचमन नसल्यामुळे येथे गर्दुले विरंगुळा केंदाच्या मागे व ओपन जिम जवळ अमली पदार्थाचे सेवन करीत असतात. तसेच तरुण-तरुणींच्या प्रणयक्रिडा दिवसा- संध्याकाळी चालतात. विरंगुळा केंदाचा कडीकोंडा तोडुन आतील टेपरेकाॅर्डर व सिलिंग फॅन काढुन नेलेला आहे. तरी याची तक्रार अध्यक्ष श्री. विनायक शंकर आव्हाड यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिलेली आहे. तसेच विरंगुळा केंदाला ग्रीलचा दरवाजा बसविणे आवश्यक आहे. विरंगुळा केंदाला अद्याप पाण्याचे कनेक्शन दिलेले नाही, त्याची दखल पनवेल महानगर पालिके तर्फे करण्यात यावी अशी नागरिकांतर्फ मागणी जोर धरत आहे.
Comments
Post a Comment