Skip to main content

कोव्हीड नियमांच्या उल्लंघनापोटी मागील 15 दिवसात 22 लक्ष 88 हजार दंडात्मक रक्कम वसूल

 सेक्टर 30 ए वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर धडक कारवाई करीत 50 हजार दंडवसूली



नवी मुंबई :कोव्हीडचा प्रतिबंध रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 'लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र' आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधाच्या 5 स्तरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका तिस-या स्तरात आहे. त्यास अनुसरून दुकाने व आस्थापना यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तशा प्रकारचे महापलिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या स्वाक्षरीचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जारी करण्यात आलेले आहेत. तथापि निर्धारित कालावधीनंतरही दुकाने / आस्थापना सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरोधात महानगरपालिकेच्या दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.


      अशाच प्रकारची कारवाई सेक्टर 30 ए, वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर 24 जुलै रोजी रात्री 11 वा. नंतर करण्यात आली असून रू. 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. 10 जुलैपासून मागील पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथकांनी तसेच 8 विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी 2442 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर मास्क, सुरक्षित अंतर, थुंकणे त्याचप्रमाणे 4 वा. नंतर दुकाने / आस्थापना सुरू ठेवणे अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करीत 22 लक्ष 88 हजार 300 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.


नवी मुंबई महानगरपलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून कोव्हीड वर्तन नियमांचे उल्लंघन करणा-या 70583 व्यक्ती / आस्थापना यांच्याकडून 3 कोटी 56 लक्ष 59 हजार 150 मात्र इतक्या रक्कमेचा दंड वसूल केलेला आहे. यामध्ये मास्कच्या कारवाईपोटी 29943 व्यक्तींकडून 1 कोटी 50 लक्ष 18 हजार, सुरक्षित अंतर व वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2804 आस्थापनांकडून 1 कोटी 16 लक्ष 44 हजार 900 आणि सुरक्षित अंतर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 36776 व्यक्तींकडून 78 लक्ष 56 हजार 650 आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे 1160 व्यक्तींकडून 11 लक्ष 39 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.       


      नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जारी करण्यात आलेल्या 'लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र'  प्रतिबंधात्मक आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने / आस्थापना 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल तसेच रेस्टॉरंट / बार / पब 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुस-या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे तिस-या वेळेस नियमांचे उल्लंघन केल्यास सदर आस्थापना कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद आहे.


      अशाप्रकारे दुस-यांदा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळलेली ऐरोली, सेक्टर 6 येथील 2 दुकाने सील करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने / आस्थापना यांच्या प्रमुखांनी दुकाने सुरू ठेवण्यासाठी 4 वाजेपर्यंत दिलेल्या सवलतीचा योग्य प्रकारे लाभ घेऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत कोव्हीड प्रतिबंधाचे नियम पालन होत आहे की नाही याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.


      *कोव्हीड नियमावलीचे उल्लंघन हे व्यक्तीगत आणि सामाजिक आरोग्याला हानी पोहचविणारे असून अशा नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींना समज मिळावी हा दंडात्मक कारवाईचा मुख्य हेतू आहे. तरी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सवलतींसह जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) ठेवून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*



Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.