Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

ऐरोली व नेरूळ रूग्णालयांचे आयसीयू बेड्समध्ये रूपांतरण कामांची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी

 वरील तीन मजल्यांच्या कामांना दिली 12 ऑगस्टची डेडलाईन कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे व त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. या अनुषंगाने त्यांनी आज महानगरपालिकेच्या ऐरोली व नेरूळ येथील सार्वजनिक रूग्णालयांना भेट देत त्याठिकाणी कोव्हीड रूग्णांसाठी करण्यात येत असलेल्या प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स निर्मिती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.* याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोलीच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड व माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रावसाहेब पोटे तसेच ऐरोलीचे स्थापत्य कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते व विद्युत कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाढे आणि नेरूळचे स्थापत्य कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे व विद्युत कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.       *ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात सध्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर तसेच नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाक

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल- रायगड, यांच्या मार्फत चार टन साहित्य महाडला रवाना

  सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक  संघ पनवेल- रायगड, यांच्या मार्फत चार टन साहित्य श्री.सौरभ वारांगे आणि शलाका वारींगे ( माजी उपाध्यक्ष सौ शिल्पा गावडे आणि माजी कोषाध्यक्ष श्री सदशिव गावडे यांची कन्या) यांच्या कडे महाडला पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी पोच केले तसेच सात टन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कलंबस्ते आणि दळवटणे,गावात तसेच गणेश नगर, रामवाडी आणि इतर वाड्यानवर श्री उदय शेट्ये हे चिपळूण मधील कामगार सेनेच्या पदाधिकारी, त्यांनी रस्ते खराब असल्याने मोठी गाडी जाऊ शकत नव्हती म्हणून चार टेम्पो मार्फत आपल्या कार्यकर्ता सह चिपळूण मधील या गावात वाड्या वाड्यात प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पोच केले, सादर कार्यात अध्यक्ष श्री केशव राणे, उपाध्यक्ष,संतोष चव्हाण, प्रीता भोजने,प्रिया खोबरकर,सचिव श्री बाप्पा मोचेमडकर,सह सचिव श्री वासुदेव सावंत,श्री प्रदीप रावले,श्री दीपक तावडे खजिनदार :श्री अनिल नेमळेकर,बाबाजी नेरूरकर संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू,सदस्य नंदकुमार वाघाटे,कार्यकर्ते अभय प्रभू,संजय गोवेकर वायगंकर,दत्ताराम सुतार,सौ अर्चना तावडे,सौ आरती सावंत, सौ सुतार,सौ रश्मी वाघाटे सौ

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सारस्वत बँकेतर्फे १ कोटींची मदत

  पनवेल, ता.२९ (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँकेंमध्ये समाविष्ठ असलेल्या सारस्वत बँकेतर्फे कोकण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ आणि इतर सर्व विभागांतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रु.१ कोटींचा निधी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे.   कोकणातील रायगड, महाड, खेड, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी तसेच कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सर्व विभागांत आलेल्या महाभयंकर जलप्रकोपामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अतिवृष्टी, समुद्राला आलेली भरती आणि धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक गावांतील पाण्याची पातळी वाढून गावं जवळजवळ १० फूट पाण्याखाली गेली. घरात पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे संसार मातीमोल झाले आहेत. जनजीवनासोबत, उद्योगधंदे तसेच शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी, पूरग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी व त्यांचे पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फेही विविध योजना राबविल्या जात आहेत.    बँकेचे अध्यक्ष श्री

दररोज ०६ हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था

  महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्यावतीने महाडकरांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. त्या अंतर्गत दररोज ०६ हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे, व पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक व्यवस्था केली जात आहे.  वरिष्ठ नेते यांच्या निर्देशानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यावर भोजन तयार करण्याची जबाबदारी सांभाळत असून त्यांची टीम तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नाना महाले, बिपीन म्हामुणकर महाडमध्ये ठाण मांडून असून ते व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजूंना भोजन, पाणी व इतर मदत पोहोचवत आहेत.   

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून गोवारी कुंटुंबियांचे सांत्वन

  पनवेल(प्रतिनिधी) कामोठे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठू काल्या गोवारी उर्फ विठूशेठ यांचे निधन झाल्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गोवारी कुटुंबियांचे सांत्वन केले.            विठू गोवारी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कुलचे १५ वर्षे स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आदी समाजोपयोगी क्षेत्रात त्यांचे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. तसेच प्रेमळ व हसतमुख आणि मनमिळावू स्वभाव म्हणून विठू गोवारी परिचित होते. त्यांचे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक २४ जुलै रोजी निधन झाले. सदरचे वृत्त कळताच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे गोवारी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सामाजिक, राजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात काम करणारा आणि समाजाची जाण असलेला ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदरांजली वाहताना केले.           यावेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, दिलीप पाटील, प्रदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर पाटील, रमेश म्हात्रे, प्

कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येणा-या कामांना अधिक गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

  कोव्हीडच्या जागतिक स्थितीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत नियमितपणे लक्ष ठेवले जात असून सध्या इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया अशा देशांमध्ये व युकेमध्ये कोव्हीड वाढीची तीव्रता अधिक आहे तसेच जपानमध्ये तर चौथी लाट सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या पूर्वतयारीला नियोजनबध्द सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने करण्यात येणा-या कोव्हीड सुविधा निर्मिती कामांची तसेच त्याठिकाणी पूरक साहित्य उपलब्धतेबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आयुक्तांमार्फत नियमित आढावा घेतला जात असून याविषयी विशेष बैठक घेत आयुक्तांनी सर्वच कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.        याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होत

महाड, चिपळूण, कोल्हापूरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकांचे अथक मदतकार्य सुरू

  नवी मुंबई : मागील आठवड्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. याठिकाणच्या जनजीवनाला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य व वैद्यकीय पथके तातडीने रवाना करण्यात आलेली आहेत. तेथे पोहचल्यानंतर तेथील स्थानिक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार महापालिका पथकांनी त्वरित मदतकार्याला सुरूवात केलेली आहे.   महाड भागामध्ये 65 अधिकारी, स्वयंसेवकांची 2 मदतकार्य पथके तसेच कोल्हापूर भागात 40 जणांचे 1 मदतकार्य पथक तेथील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे काम करीत आहे. त्याचप्रमाणे 15 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेले एक वैद्यकीय पथक चिपळूण भागात तसेच 24 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेले दुसरे पथक महाड भागामध्ये आरोग्य तपासणी व जपणुकीचे काम समर्पित भावनेने करीत आहे. अतिवृष्टीत जलप्रलय उसळल्याने या भागांमध्ये मोठ्या उंचीचे गाळाचे थर साचलेले असून कचराही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नवी मुंबई

135 घरगुती गॅस वितरण करणा-या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सनी घेतला कोव्हीड लसीकरणाचा लाभ

  विविध सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींना कोव्हिडपासून संरक्षण लाभावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार त्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणा-या 135 कर्मचा-यांचे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयांत कोव्हीड लसीकरण करण्यात आले.*      *यामध्ये सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे 40, माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथे 41 व राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथे 54 घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणा-या कर्मचा-यांनी कोव्हीड लस घेतली.* कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार दैनंदिन लसीकरणाचे नियोजन केले जात असून यामध्ये दररोजच्या कामकाजात नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जात असून त्यांच्याकरिता विशेष सत्रांचे आयोजन केले जात आहे.       25 जूनपासून पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स अशा विविध घटकांचे लसीकरण केले जात असून आजताग

ईश फाऊंडेशन तर्फे खारघर मध्ये पोलीस अधिकारी आणि अग्निशामक दलातील कर्मचारी यांचा सन्मान

  पनवेल दि.28 (वार्ताहर)- खारघर येथील पांडव कडा किंवा त्यांच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये पावसाळ्यात फिरायला जाने यासाठी पोलीस यंत्रनेकडून पूर्णता बंदी आहे.खारघरची लोकसंख्या जवळपास पाच लाखाच्या आसपास आहे.शिवाय या ठिकाणी खारघर लगत असणाऱ्या शहरामधुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. बंदी असल्यामुळे पोलीसानच्या  बरोबर नेहमी वादविवाद होतात.काही लोक अतिशय धोकादायक मार्गाने डोगर किंवा वाहत्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.अश्या प्रकारामुळे पांडव कड़ा येथे १६ लोकांचा मृत्यु झाला आहे.         दिनांक १८/७/२१ रोजी खारघर सेक्टर ५ (गोल्फ कोर्स) येथील डोंगरावर ११८ लोक फसले आहेत.अशी माहिती खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शत्रुघ्न माळी यांना प्राप्त झाली.त्यांनी क्षणाची विलंब न करता आपले सहकारी आणि अग्निशामकचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांना घेऊन  स्वतचा जीव धोक्यात घालून या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढले. या कामाचे कौतुक खारघर वासियाने केले. या कामाचे नक्कीच कौतुक व्हावे यासाठी ईश फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कीर्ती मेहरा यांनी  जीवन तारणहार पुरस्कार , वास्तविक नायक  ( Life Saviour Awar

कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येणा-या कामांना अधिक गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

  नवी मुंबई : कोव्हीडच्या जागतिक स्थितीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत नियमितपणे लक्ष ठेवले जात असून सध्या इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया अशा देशांमध्ये व युकेमध्ये कोव्हीड वाढीची तीव्रता अधिक आहे तसेच जपानमध्ये तर चौथी लाट सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या पूर्वतयारीला नियोजनबध्द सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने करण्यात येणा-या कोव्हीड सुविधा निर्मिती कामांची तसेच त्याठिकाणी पूरक साहित्य उपलब्धतेबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आयुक्तांमार्फत नियमित आढावा घेतला जात असून याविषयी विशेष बैठक घेत आयुक्तांनी सर्वच कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.        याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, चांगू काना ठाकूर महाविद्यालय, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सच्या वतीने महाडसाठी मदत रवाना

  पनवेल(प्रतिनिधी) महाडकरांवर आलेल्या अस्मानी संकटात तेथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय(स्वायत्त), रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक अन्नधान्य किट तसेच इतर साहित्य आज (दि. २७) सकाळी महाडला रवाना झाले.           लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजोपयोगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय(स्वायत्त), खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएसच्यावतीने महाड येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून ४५० अन्नधान्य किट, बेबी फुड, मेडिकल किट, कपडे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक किट आदी साहित्य महाडला पाठविण्यात आले.            यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे

पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मनपा आयुक्त उपस्थित

  महापालिका प्रशासनाकडून आमदारांच्या सूचनांचा स्वीकार  गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबत आयुक्त सकारात्मक पनवेल(प्रतिनिधी) पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पनवेलकरांची गैरसोय होते.  जास्त पाऊस झाल्यानंतर शहराला पुराची भीतीसुद्धा अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आज (मंगळवार, दि. २७) आमदार प्रशांत ठाकूर आणि मनपाचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनांचा महापालिका प्रशासनाने स्वीकार केला. या शिवाय गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.     पनवेल शहरात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बी वर भराव घालून त्या ठिकाणी पूल बांधण्यात आला. तेव्हापासून पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे पनवेल शहरातील खाडीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. जास्त पाऊस झाल्यानंतर बावन बंगला, मिंडल क्लास हाउसिंग सोसायटी, लोखंडी पाडा स

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी-पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

  अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे.   या घटनेमध्ये सर्व परिवार मृत पावले आहेत, यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि.27 जुलै) रोजी महाड मधील तळीये या गावी शोक व्यक्त केला आहे.      राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.       यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार,जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.         राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प

वाहनाची मोटार सायकलला धडक ; 1 ठार, 1 जखमी

 पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः भरधाव वेगात घेवून चाललेल्या वाहनावरील चालकाने त्याच्यापुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण खाली पडून त्यातील एक जण गंभीररित्या जखमी होवून मयत पावला आहे. तर दुसरा सहकारी जखमी झाल्याची घटना गव्हाण फाटा चौक पोलीस चौकीसमोर घडली आहे. दत्तात्रेय कोडग (38) हा त्याच्या ताब्यातील वाहन घेवून गव्हाण फाटा चौक येथून जात असताना त्याने पुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून धडक देवून त्यात मोटार सायकलवरील योगेश जानकर (24) व त्याचा सहकारी समाधान दोलताडे (27) हे दोघे खाली पडले. यात योगेश यास किरकोळ दुखापत तर त्याचा मित्र समाधान याला गंभीररित्या जखमी झाल्याने तो त्यात मयत झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पूरग्रस्तांना भाजपकडून आधार; पनवेल महिला मोर्चाकडून महाडमध्ये महिलावर्गाला कपडे वाटप

  पनवेल(प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधून शक्य होईल ती सर्व मदत केली जात आहे. याच सेवाकार्यात योगदान देत भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या वतीने मंगळवारी (दि. २७) महाडमधील महिलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.  महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत व्हावी यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर यात योगदान देण्याचे आवाहन नागरिकांनाही करण्यात आले आहे. त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जमा झालेली मदत महाडमध्ये जाऊन पूरग्रस्तांना केली जात आहे. या काळात पूरग्रस्त महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः त्यांना कपड्यांचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलतर्फे विविध प्रकारची वस्त्रे, तसेच सॅनिटरी नॅपकिन जमा करून हे सर्व महाड येथे जाऊन महिलावर्गास देण्यात आले.  या वेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्र

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना

  नवी मुंबई :कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अशा संकटसमयी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. या अडचणीच्या परिस्थितीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने शनिवारीच महाड भागाकडे रवाना झाले असून त्यांनी त्याठिकाणी मदतकार्यास सुरूवात केलेली आहे.       मदतकार्याची वाढती गरज लक्षात घेऊन माणगांवच्या प्रांत श्रीम. प्रशांती दिघावकर यांच्या विनंतीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने रविवारी स्वच्छता निरीक्षक श्री. विजय पडघन व उपस्वच्छता निरीक्षक श्री. दिपक शिंदे यांचेसह 20 स्वयंसेवकांचे आणखी एक मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह महाडच्या दिशेने रवाना केले असून त्यांनीही तेथे पोहचून लगेच मदत कार्यवाहीस सुरूवात केलेली आहे. या पथकासोबत मिनी ट्रक, मिनी टिप्पर, 4 पाण्याचे टँकर, 2 टन कार्बोलिक पावडर पाठविण्यात आलेली आहे.       तसेच या पथकासमवेत लेट्स सेलिब्रेट फिटनेस या सेवाभावी संस्थेने तेथील आपद्ग्रस्तांसाठी 7 हजार लि. पिण्याच्या पाण्याच्या

कंटेनरची एसटीस धडक ; सहा प्रवासी जखमी

  पनवेल दि. २६ (संजय कदम): भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर कंपनीच्या कंटेनरने एसटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ कोन ब्रीज पनवेल एक्झिटवर घडली आहे.             आयशर कंटेनर क्र.-एमएच 04 एचवाय 5281 हा घेऊन त्याचा चालक भरधाव वेगानेपनवेलजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ कोन ब्रीज पनवेल एक्झिटवरून जात असताना त्याने एसटी बस क्र.-एमएच 14 बीटी 3253 हिस पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एसटी बसचालक मुदस्सीर रसुलसाब शेख (वय-37), कावेरी पाटील (वय-21), दत्ता पवार (वय-40), रंजना शिराळकर (वय-56), वर्षा परंजापे (वय-53), किशोर खांडे भरड (वय-32) हे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दुचाकी वाहनांची चोरी

 पनवेल दि. २६ (संजय कदम): तळोजा परिसरातून दोन दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.         सूरज पाटील यांची 10 हजारांची एक्टीव्हा होंडा क्र.-एमएच 46 एस 6909 हि हलोबियर कंपनीच्या गेटबाहेर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत विनायक घरत यांची 45 हजारांची होंडा सीबी शाईन क्र.-एमएच 46 बीएच 9768 हि आसाई इंडिया ग्लास कंपनीच्या गेटबाहेरील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे

मेट्रोपोलिस पॅथोलॉजी व अमूल आईस्क्रीम पार्लरमध्ये घरफोडी..

 पनवेल दि. २६ (संजय कदम): तळोजा फेज-01 येथील मेट्रोपोलिस पॅथोलॉजी शॉप नं.-3 व अमूल आईस्क्रिम पार्लप शॉप नं-1 बालाजी हाईट्स हि दुकाने बंद असताना अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत रोखरक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.               सदर दुकाने बंद असल्याचे पाहून लोखंडी शटरचे कुलूप कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन्ही दुकानात मिळून 10,790 रूपये रोखरक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे

पूरग्रस्तांना एक हात मदतीचा द्या-नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील

  खारघर(प्रतिनिधी)-  *एक हात मदतीचा* नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महाड येथे आलेल्या आपत्तीग्रस्त भागात मदत करण्यासाठी प्रभागातील रहिवाश्यांना आवाहन केल्यानंतर लगेच आज दुपारपर्यंत मोठया प्रमाणात कपडे, साड्या, सॅनिटरी नॅपकीन तसेच बिस्किट पाकिटे लोकसहभागातून जमा करण्यात आले. सदर सर्व वस्तू या पनवेल येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे जमा करून त्यांचे वर्गीकरण करून उद्या ते महाड येथे भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर व सहकारी यांच्यामार्फत गरजूंना पोहोचवण्यात येतील.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष पथक महाडकडे रवाना

  कोकणातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे उसळलेल्या जलप्रलयाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानानुसार विविध पातळ्यांवरून मदतीचा हात पुढे केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अशा संकटकाळी नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेतलेला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने आज सकाळी 7 वाजता महाडच्या दिशेने रवाना झाले आहे.*       एक बस, 2 जीप आणि आवश्यक साधनसामुग्रीसह 43 जणांच्या या पथकास महाडकडे रवाना होताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करून सक्रीय मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्याठिकाणी माणगावच्या प्रांत श्रीम. प्रशांती दिघागावकर यांच्या नियंत्रणाखाली हे पथक आवश्यक ते मदतकार्य करणार असून त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात टिकाव, फावडे, घमेली, कुदळ, पहार, काटा फावडे, कचरा भरण्यासाठी मोकळ्या गोणी, मास्क, हॅन्डग्लोव्ह्ज, गमबूट असे आवश्यक साहित्य तसेच कार्बोलिक

कोव्हीड नियमांच्या उल्लंघनापोटी मागील 15 दिवसात 22 लक्ष 88 हजार दंडात्मक रक्कम वसूल

 सेक्टर 30 ए वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर धडक कारवाई करीत 50 हजार दंडवसूली नवी मुंबई :कोव्हीडचा प्रतिबंध रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 'लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र' आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधाच्या 5 स्तरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका तिस-या स्तरात आहे. त्यास अनुसरून दुकाने व आस्थापना यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तशा प्रकारचे महापलिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या स्वाक्षरीचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जारी करण्यात आलेले आहेत. तथापि निर्धारित कालावधीनंतरही दुकाने / आस्थापना सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरोधात महानगरपालिकेच्या दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.       अशाच प्रकारची कारवाई सेक्टर 30 ए, वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर 24 जुलै रोजी रात्री 11 वा. नंतर करण्यात आली असून रू. 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. 10 जुलैपासून मागील पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथकांनी तसेच 8 विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी 2442 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर मास्क, सुरक्षित अंतर, थु

धुतूमच्या कन्येचा चित्रपटसृष्टीत बोलबाला!-पलक कडू या अकरा वर्षीय मुलीचा साईमंदिरतर्फे सत्कार!

  मालिका, वेबसीरिज, जाहिरात क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या पलक राजन कडू हिचा साईमंदिर, वहाळतर्फे अरुण बुवा कारेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ती उरण तालुक्यातील धुतूमची रहिवासी आहे. तिचे वय अवघे अकरा वर्षांचे आहे; परंतु तिने अतिशय कमी वयात सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे ती खेळातही आपले कौशल्य दाखवत आहे. त्यामुळे धुतूमच्या या कन्येचा परिसरात नावलौकिक असून तिच्या कामगिरीची दखल अनेक ठिकाणी घेतली जात आहे. फ्लेश- वेबसीरिज, अहिल्याबाई होळकर, विद्या, क्राईम पेट्रोल, संजीवनी आदी मालिकांत ती वेगवेगळ्या भूमिका करीत आहे. तसेच मोठमोठ्या ब्रॅंडच्या जाहिरातींतही तिने काम केले आहे. विशेष म्हणजे तिने रशियात किक बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळात नैपुण्य मिळविले आहे. तिने नुकतेच वहाळच्या साईमंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी साई देवस्थानचे संस्थापक रवींद्र पाटील तिथे उपस्थित होते. त्यांनी तातडीने तिची दखल घेऊन तिचा विशेष सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी मो. का. मढवी गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्

महाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप

  महाड( प्रतिनिधी) पुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारपासून (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. यामध्ये महाडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व काही भिजून, वाहून गेले असल्याने दोन वेळची भूक कशी भागवावी याही विवंचनेत ते आहेत. हे ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग दुसर्‍या दिवशीही महाडचा दौरा केला आणि तेथील नागरिकांना तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. गुरुकुल शाळेत हा मदतीचा कॅम्प लावण्यात आला आहे, तसेच नागरिकांच्या घरातील आणि व्यापार्‍यांच्या दुकानातील चिखल काढण्यासाठी दोन टँकर अहोरात्र फिरत आहेत. या वेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, युवा नेते वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस बिपीन महामुणकर, राजेश मपारा, अक्षय ताडफळे, पनवेल महापालिकेचे स्थायी

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गतिरोधकांवरती पांढरे पट्टे मारण्यात आले

  कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील सेक्टर २० विश्वज्योत शाळेसमोर गतिरोधक टाकण्यात आला होता परंतु सदर ठिकाणी सिडकोचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे पांढरे पट्टे न मारल्यामुळे अनेक तरुणांचे अपघात झाले व ते गंभीर जखमी देखील झाले होते त्याठिकाणी पांढरे पट्टे (Thermostat Paint ) मारून घेतले. #माझाप्रभाग #माझीजबाबदारी

सन्मानिय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने "शिवसंपर्क अभियाना अंतर्गत"२५ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

  रविवार दिनांक २५ जुलै २०२१ रोजी   शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री *सन्मानिय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब* यांच्या वाढदिवसा निमित्ताने *शिवसंपर्क अभियाना अंतर्गत* सध्याच्या कोरोंना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता *शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री.शिरीष घरत साहेब* यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल रायगड आयोजित *भव्य रक्तदान शिबिर* शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी शिवसेना पनवेल विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा सल्लागार, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुका प्रमुख, तालुका संघटक, विधानसभा संघटक, महानगरप्रमुख, महानगर संघटक, उपतालुका प्रमुख, विधानसभा समन्वयक, महानगर समन्वयक, तालुका संपर्क प्रमुख, उपमहानगर प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, तसेच महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका, उपजिल्हा संघटिका, विधानसभा संघटिका, तालुका संपर्क संघटिका, तालुका संघटिका, महानगर संघटिका, उपतालुका संघटिका, उपमहानगर संघटिका, शहर संघटिका, व सर्व महिला पदाधिकारी,युवासे

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

  पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे* *नागरिकांनीही खबरदारी बाळगावी*.   मुंबई दि २२: गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा सांगितला आहे व रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला  असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने   या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता श्री तिरमणवार आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  यावेळी सर्व यंत्रण

स्वाक्षरी अभियान शुभारंभ प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक खेळाडूंना आयुक्त व क्रीडापटूंनी दिल्या शुभेच्छा

  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमधील विविध क्रीडा प्रकारांत भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्रातील 10 खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता आयोजित "स्वाक्षरी मोहीम अभियान" शुभारंभ महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्या वतीने देण्यात आलेल्या मोठ्या स्वाक्षरी फलकावर आयुक्तांनी स्वाक्षरी करून तसेच सेल्फी पॉईंटवर शुभेच्छापर छायाचित्र काढून 'ऑलिम्पिक डे' च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उपआयुक्त श्री. मनोज महाले व श्रीम. क्रांती पाटील यांनीही स्वाक्षरी फलकावर शुभेच्छा दिल्या. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी व अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू श्रीम. अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी व शुटिंगबॉलचे राष्ट्रीय कर्णधार श्री. रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागरी जलतरण

आता कोव्हीड लसीकरणाविषयीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध

  https://www.nmmccovidcare.com  या विशेष पोर्टलवर सुविधा* संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हीड लसीकरणाव्दारे संरक्षित करण्याकडे नवी मुंबई महानगरपलिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुलभपणे लसीकरण करून घेता यावे याकरिता महापालिका क्षेत्रात सध्या 2 ड्राईव्ह इन केंद्रांसह 78 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून अधिक लस साठा उपलब्ध झाल्यास लसीकरणाला गती देण्याच्या दृष्टीने शंभराहून अधिक लसीकरण केंद्रे लगेच कार्यान्वित करण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.       सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत असून दुस-या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणा-या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांव्दारे तसेच व्हॉट्स अपव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्द करण्यात येत आहे.       याशिवाय *नागरिकां

नवी मुंबईतील 56 क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक यांचे कोव्हीड 19 लसीकरण

  नवी मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांच्या संयुक्त विदयमाने 'ऑलिम्पिक डे' च्या निमित्ताने भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.         यामध्ये राज्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोव्हीड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबईतील राज्य, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कोव्हीड लसीकरणाचे विशेष सत्र नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते.        यामध्ये आकांक्षा बरजे, जोयल जॉन, तेजस कदम, मदन झा, शक्तीसिंग यादव, रिध्दी शेट्टी, यशमिता म्हात्रे, नागेश राजभर, सचिन ठाकूर, विघ्नेश मोहन, इशिता सुर्वे अशा 11 राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविलेल्या खेळाडूंसह राज्यस्तरावरील 32 खेळाडूंनी लसीकरणाचा लाभ घेतला. अशाप्रकारे 43 खेळाडूंसह खेळाडूंना प्रशिक्षण देणारे 13 क्रीडा प्रशिक्षक अशा एकूण 56 व्यक्

खारघर डोंगरात अडकलेल्या ११६ जणांची अग्निशामक दलाच्या सहाय्याने पोलिसांनी केली सुखरूप सुटका

  खारघर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी फलक, सोशल मिडीया व्दारे , प्रेस , व बंदोबस्त साठी असलेले पोलिस नी वेळोवेळी सांगुन सुध्दा काही नागरीक विशेष करून महिला ह्या पोलिस ची नजरचुकवुन  आड मार्गाने खारघर डोंगरात जातात आणि स्वताच जीव धोक्यात घालतात  काल सायंकाळी गोल्फ कोर्स च्या मागील नाल्यास पावसाने अचानक वाढ झाल्याने डोंगरात फिरावयास गेले 116 इसम त्यात 78 महिला 5 मुले हे पलिकडे अडकल्याची माहिती खारघर पोलिस ठाण्यांत मिळाल्याने फायर ब्रिगेड च्या जवानांचे साह्याने सर्वाना सुखरूप बाहेर काढले ...अडकलेल्या सर्वानी फायर ब्रिगेड खारघर  व नवी मुंबई पोलीस चे आभार मानले ... तरी नागरिकांनी स्वताच जीव धोक्यात घालू नये असे आवाहन खारघर पोलीस स्टेशन चे श्री शत्रुघ्न माळी वपोनि खारघर यांनी केले असुन कोणी डोंगरात आढळुन आल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

पहिल्या दिवशी 27 गर्भवती महिलांचे कोव्हीड लसीकरण

  गर्भवती महिलांना कोव्हीड 19 पासून संरंक्षण मिळावे यादृष्टीने शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालयात लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणाच्या आज पहिल्याच दिवशी 27 गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले तसेच 232 गर्भवती महिलांचे लसीकरणाबाबत संपूर्ण माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले.       गर्भवती मातांना कोविड लसीकरणाव्दारे संरक्षित करणेविषयी जागतिक स्तरावर संशोधन करण्यात येत होते. यामध्ये कोविड 19 आजाराचा गर्भवती माता तसेच गर्भावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यास अनुसरून राष्ट्रीय तांत्रिक लसीकरणविषयक मार्गदर्शक समुह - NTAGI (National Technical Advisory Group for Immunizaion) तसेच जागतिक आरोग्य संघटना यांच्या शिफारशीनुसार गरोदर मातांना लसीकरण करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाने निर्णय घेतला.       या शिफारसींनुसार - गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या कालावधीत केव्हाही लसीकरण करता येईल. गरोदरपणाच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या Td लसी सोबत कोविड 19 लस देता येईल. मात्र सोबत दिली न गेल्

मुंबई-पुणे एक्सप्रेस वर आरटीओची द्रुतगती मोहीम ; नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई

  पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्‍या वाहन चालकांवर आरटीओ ने कारवाई केली. पनवेल पेण  पिंपरी चिंचवड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने ही मोहीम राबवून नियम मोडणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाच प्रकारच्या मोहिमा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबवल्या जाणार आहेत.  मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. या वेगवान रस्त्यावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्याचबरोबर  अवजड आणि इतर वाहनांकडून लेन  कटिंग केली जाते. त्याचबरोबर इतर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या कारणाने अपघाताला एक प्रकारे निमंत्रण दिले जाते. काही दिवसांपूर्वी बोर घाटात अशाच प्रकारे भीषण अपघात घडला होता. दररोज लहान-मोठे अपघात द्रुतगती महामार्गावर होतात. यामुळे अनेकांचे नाहक बळी जातात. या सर्व दृष्टिकोनातून आरटीओ, वाहतूक आणि महामार्ग पोलिसांकडून सातत्याने जनजागृती आणि प्रबोधन केले जाते. तरीसुद्धा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या सर्व दृष्टिकोनातून परिवहन विभागाकडून भरारी प

17 जुलैपासून गर्भवती महिला यांच्या लसीकरणाला सुरुवात

  कोविड 19 लसीकरणाच्या सुरूवातीपासून गर्भवती महिलांचा समावेश लसीकरणामध्ये करण्यात आला नव्हता. आता आरोग्य तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार तसेच शासकीय आदेशानुसार गर्भवती महिलांच्या लसीकरणाला मान्यता मिळाली आहे. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन महापालिका सार्वजनिक रुग्णालयात सकाळी 9 ते 5 या वेळेत उद्या दि.17 जुलैपासून कोव्हीड लसीकरणाला सुरुवात होत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवती माता मोठया प्रमाणात बाधित झाल्याचे आढळून आले. तसेच कोविड 19 आजारामुळे गर्भवतींमध्ये अकाली प्रसूती, जंतू संसर्ग, मृत्यू काही प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे गरोदरपणात कोविड 19 आजार झाल्यास आजाराची तीव्रता वाढत असल्याचेही दिसून आले. या अनुषंगाने गर्भवती मातांना कोविड लसीकरणाव्दारे संरक्षित करणेविषयी विविध पातळ्यांवर संशोधन करण्यात येत होते. यामध्ये कोविड 19 आजाराचा गर्भवती माता तसेच गर्भावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यास अनुसरून गर्भवती महिलांचे लसीकरण करावयाचे झाल्यास कोणत्या तिमाह

खारघर येथील सेक्टर २१ मध्ये जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात चोरी

  नवी मुंबई प्रतिनिधी (संदीप जाधव) :खारघर सेक्टर 21 प्लाॅट क्रमांक 13 येथे चोरी, सिडकोने वरील ठीकाणी जेष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद बांधुन दिलेले आहे. सदर विरंगुळा केंदाचा वापर भजन, हरिपाठ, योगा, आचार्य अत्रे ग्रंथालय व वाचनासाठी केला जातो. तसेच मेडिकल कॅम्प भरवले जातात. लाॅकडाउनमुळे जेष्ठ नागरिकांचे कार्यक्रम सध्या बंद आहेत. तसेच विद्यार्थी त्याचा अभ्यासिका म्हणुन वापर करीत आहेत. आचार्य अत्रे उद्य्यानाच्या दोन्ही गेट 24 तास उघडे असतात. उद्यानासाठी व विरंगुळा केंदासाठी सिक्युरिटी वाॅचमन नसल्यामुळे येथे गर्दुले विरंगुळा केंदाच्या मागे व ओपन जिम जवळ अमली पदार्थाचे सेवन करीत असतात. तसेच तरुण-तरुणींच्या प्रणयक्रिडा दिवसा- संध्याकाळी चालतात. विरंगुळा केंदाचा कडीकोंडा तोडुन आतील टेपरेकाॅर्डर व सिलिंग फॅन काढुन नेलेला आहे. तरी याची तक्रार अध्यक्ष श्री. विनायक शंकर आव्हाड यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिलेली आहे. तसेच विरंगुळा केंदाला ग्रीलचा दरवाजा बसविणे आवश्यक आहे. विरंगुळा केंदाला अद्याप पाण्याचे कनेक्शन दिलेले नाही, त्याची दखल पनवेल महानगर पालिके तर्फे करण्यात यावी अशी नागरिकांतर्फ मागणी

खारघर शहर पोलीस व वाहतूक पोलिसांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पावसाळी छत्र्यांचे वाटप. वरिष्ठांनी केले प्रतिष्ठानचे कौतुक

  पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पोलीस बंधू - भगिनींना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितुकाका खानविलकर, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी.डी.गायकवाड व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या सहकार्याने खारघर शहर पोलीस व खारघर वाहतूक पोलिसांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी साहेब, खारघर वाहतूक शाखेचे आनंद चव्हाण साहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी. डी. गायकवाड, सहचिटणीस केवल महाडिक, तालुका संघटक प्रमुख ओमकार महाडिक, साम्राज्य न्यूजच्या साक्षी सागवेकर, लखबिर सिंग यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची मालधक्का परिसरातील महिलांसोबत बैठक संपन्न. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत मालधक्कामधील महिलांचा प्रवेश

  पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल परिसरातील मालधक्का येथील महिलांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या बैठकीत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस डी. डी. गायकवाड यांनी झोपडपट्टी धारकांना एसआरए, सरकारी आरोग्य विमा, अपघात विमा, मुलांचे भवितव्य व शिक्षण कसे करून घेता येईल यावर मार्गदर्शन केले व लवकरच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे परिसरात लवकरच याबाबत जनजागृती करण्यासाठी शिबीर आयोजित केला जाणार असल्याचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व सहचिटणीस केवल महाडिक यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे महिलांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी. डी. गायकवाड, सहचिटणीस केवल महाडिक, तालुका संघटक प्रमुख ओमकार महाडिक, समाजसेविका आयेशा कुरेशी, जस्मिन नझे,  आयुब शेख, हसीना शेख, संगीता मुंगशे, राबिया शेख यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपास्थित होते.