Skip to main content

कोव्हीडमुळे पालकांचे छत्र हरविलेली मुले तसेच पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा मदतीचा हात*

 


कोव्हीडच्या पहिल्या व दुस-या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. त्याचप्रमाणे कोव्हीडमुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

      अशा अनाथ बालकांची तसेच कोव्हीडमुळे पतीचे आकस्मिक निधन झालेल्या महिलांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही महानगरपालिकेची सामाजिक बांधिलकी आहे हे लक्षात घेत अशा संकटकाळात अनाथ मुलांना तसेच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

      (अ) कोव्हीडमुळे दोन्ही पालक / एक पालक गमावलेल्या मुलांकरिता कल्याणकारी योजना- 

         (i)  कोव्हीडमुळे दो्न्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य

एक  पालक  गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य

वय वर्ष 0 ते 5 - रू. 2000 प्रतिमहा

वय वर्ष 0 ते 5 -   रू. 1000 प्रतिमहा

वय वर्ष 6 ते 10 - रू. 4000 प्रतिमहा

वय वर्ष 6 ते 10 -  रू. 2000 प्रतिमहा

वय वर्ष 11 ते 18 - रू. 6000 प्रतिमहा

वय वर्ष 11 ते 18 - रू. 3000 प्रतिमहा


      वरील टप्प्यांनुसार ते बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणा-या अर्थसहाय्यास पात्र राहील.

        (ii)  अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता महानगरपालिकेमार्फत आधीपासूनच स्वतंत्र योजना सुरू असल्याने

             कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक

             बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य - रू. 50 हजार प्रतिवर्ष.

      (ब) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांकरिता कल्याणकारी योजना- 

         (i) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी अर्थसहाय्य देणे - रू. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.

            त्याचप्रमाणे -

         (ii) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करून घेणेकरिता

            अर्थसहाय्य करणे - स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेस संपूर्ण हयातीत एकदाच रू. 1 लक्ष

             रक्कमेपर्यंतचे अर्थसहाय्य ( दोन टप्प्यात ).

            कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेली महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.

            या चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in यावर- 'विभाग' → 'समाजविकास' → समाजविकास विभाग सेवा' → 'कोव्हीड योजना' या लिंकवर सहजपणे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे उपआयुक्त (समाजविकास), तळमजला, महापालिका मुख्यालय, सेक्टर 15, सीबीडी बेलापूर किंवा समाजविकास विभाग कार्यालय, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर याठिकाणीही कार्यालयीन वेळेत माहिती उपलब्ध होऊ शकेल.

      कोव्हिडचा काळ हा सर्वांसाठी अत्यंत कठीण होता. दुर्दैवाने अनेक कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय कोव्हीडमुळे गमावले. ही झालेली हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मात्र दोन्ही किंवा एक पालक गमावलेली मुले तसेच कोव्हिडमुळे वैधव्य आलेल्या महिला यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून जगण्याची उभारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटेसे योगदान म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या 4 नवीन योजना राबविल्या जात असल्याचे सांगत कोव्हीडमुळे मृत्यू झाल्याने ज्या मुलांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावलेले आहेत अशा मुलांचा सांभाळ करणा-या व्यक्ती/संस्था यांनी अथवा आपले पती गमावलेले आहेत अशा महिलांनी महानगरपालिकेच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजविकास विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.