Skip to main content

रस्त्यावरील बेघर निराधार व्यक्तींचे कोव्हीड लसीकरण करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका

 



नवी मुंबई :कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असताना लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून वृध्दाश्रम, अनाथाश्रमात असलेले बेडवरील रूग्ण, वृध्द तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

      यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे डोक्यावर कोणत्याही प्रकारचे छप्पर अथवा निवारा नसणा-या रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणा-या बेघर निराधार व्यक्ती. असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील दहा दिवसात महानगरपालिकेच्या आठही विभागांत निराधार बेघरांसाठी कोव्हीड लसीकरणाची ही विशेष मोहीम राबविली जाणार असून आज बेलापूर विभागापासून लसीकरणास सुरूवात करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.

      समाजविकास व आरोग्य विभागामार्फत आयुक्तांच्या निर्देशानुसार मागील 15 दिवसांपासून या मोहिमेच्या नियोजनाचे काम सुरू करण्यात आले असून समाजविकास विभागातील समुह संघटकांमार्फत प्रत्येक विभागातील 8 ते 10 ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणांवर जाऊन लसीकरण करण्यासाठी डॉक्टर व नर्सेससह विशेष आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले असून सदर पथक निश्चित केलेल्या ठिकाणांवर रूग्णवाहिकेतून जाऊन समुह संघटकांनी त्याठिकाणी एकत्र केलेल्या निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरण करीत आहे.

      अशा बेघर निराधारांकडे कोणताही कागदपत्रांचा पुरावा नसल्याने मशीनव्दारे अशा व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर एन्ट्री करण्यात येत आहे. हे बोटांचे ठसे त्यांच्या दुस-या डोसवेळी ओळख पटविण्यासाठी महत्वाचे असणार आहेत.

      लसीकरणासाठी आणलेल्या बेघर निराधार व्यक्तीसाठी लसीकरणाची रूग्णवाहिका उभी असेल त्याठिकाणी प्रथमत: हात धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांच्याकरिता चहा, बिस्कीट व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर मशीनवर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर रितसर नोंदणी करून त्यांचे लसीकरण केले जात आहे व त्यांना 30 मिनीटे निरीक्षणासाठी थांबविण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांना मास्कचा वापर करणे आणि इतर कोव्हीड सुरक्षा नियम पालनाविषयी माहिती दिली जात असून त्याचे पालन करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज बेलापूर विभागात विविध 19 ठिकाणी 103 निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरणाविषयी समुपदेशन करण्यात आले असून त्यामधील 14 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

      रेल्वे स्टेशन्स, उड्डाणपुलाखालील जागा, धार्मिक स्थळांबाहेरील जागा अशा बेघर निराधार व्यक्ती आढळणा-या प्रत्येक विभागातील जागांचा समुह संघटकांमार्फत शोध घेण्यात आला असून त्याठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. या मोहीमेकरिता संकलित माहितीचा उपयोग समाजविकास विभागास यापुढील काळात लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी होणार आहे. 

      नवी मुंबईतील कोणताही घटक कोव्हीड लसीकरणापासून वंचीत राहू नये याची महानगरपालिकेच्या वतीने काळजी घेण्यात येत असून प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार आज बेलापूर विभागापासून निराधार बेघर व्यक्तींच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आलेली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड लस ही पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी आपल्याला आज उपलब्ध असलेली लस लगेच घेऊन स्वत:ला संरक्षित करून घ्यावे असे आवाहन केले आहे.



Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.