Skip to main content

कोव्हीडच्या तिस-या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना

 


नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आजपासून कोव्हीड प्रतिबंधात्मक तिस-या स्तरासाठीची नियमावली लागू करण्यात आली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे विभाग कार्यालय व मुख्यालय स्तरावरून काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश विशेष दक्षता पथकांना देण्यात यावेत असे आदेशित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढ करण्यात येत असलेल्या सर्व आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत कार्यपूर्ततेसाठी 31 जुलैची डेडलाईन दिली,.


      कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीबाबतच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.


      दुसरी लाट काही प्रमाणात ओसरू लागल्याचे निदर्शनास आले तरी महानगरपालिकेने टेस्टींगचे प्रमाण कमी केलेले नाही. सध्या नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट भागांमध्ये टारगेटेड टेस्टींग वाढविण्यात आलेले आहे. डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग वाढवून कोव्हीड पॉझिटिव्ह असणारे सर्व रूग्ण शोधून काढणे व त्यांना विलगीकरणात ठेवून त्यांची हालचाल प्रतिबंधित केल्यामुळे कोव्हीडचे पुढचे संक्रमण रोखणे हा उद्देश नजरेसमोर ठेवून टेस्टींग वाढविण्यात आलेले आहे. शनिवारी व रविवारी मॉलमध्येही टेस्टींग केले जात होते. तथापि  नव्या तिस-या स्तरातील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार मॉल बंद झाल्याने येथील टेस्टींग होणार नसून आता मार्केट व बसडेपो याठिकाणी टेस्टींग सुरु करण्यात यावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. 


      नेरुळ व ऐरोली रुग्णालयांतील आयसीयू सुविधा निर्मितीचे कामाचा आढावा घेताना स्थापत्य आणि इलेक्ट्रिकल कामे 31 जुलै हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून अथक काम करून पूर्ण करावीत असे निर्देश अभियांत्रिकी विभागास आयुक्तांनी दिले. याला समांतरच येथील आरोग्यविषयक उपकरणे, यंत्रसामुग्री, औषधे उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी व 31 जुलैपर्यंत तीही पूर्ण करून घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या. या सर्व बाबींची नेमकी कोणत्या टप्प्यातील कार्यवाही सुरू आहे याचा सुविधानिहाय आढावा आयुक्तांनी बारकाईने घेतला.  


      दुस-या लाटेमधील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याकरिता नियोजन करण्यात आले असून 5 पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लान्टपैकी एका प्लान्टचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चारही ऑक्सिजन प्लान्टची कामे 31 जुलैपर्यंत पूर्ण होतील याकडे लक्ष ठेवून प्लान्ट उभारणीची कार्यवाही विहित वेळेत करावी व सीएसआर निधीतून उपलब्ध होणा-या एका प्लान्टचीही कार्यवाही जलद सुरु करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. या सोबतीनेच ऑक्सिजन स्टोरेजचे 2 प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याचेही सूचीत करण्यात आले. यासोबतच ड्युरा सिलेंडर वाढ करण्याबाबत गतीमान कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या.


      कोव्हीड विषयक आरोग्य सुविधांमध्ये वाढ करतानाच नॉन कोव्हीड आरोग्य सुविधांच्या पूर्ततेकडे विशेषत्वाने प्रसूतीविषयक बाबींकडे लक्ष देत वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्याच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच त्या प्रमाणात रुग्णवाहिकांचीही वाढ करण्याच्या दृष्टीने 2 दिवसात आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.


      तिस-या लाटेविषयी जागतिक सद्यस्थितीचा आढावा घेऊन व नामांकित आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेली अभ्यासपूर्ण निरीक्षणे व मते विचारात घेऊन कोव्हीडच्या तिस-या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना करीत आहे. तथापि तिस-या लाटेला जेवढा विलंब करता येईल तेवढी त्यापासून होणारी हानी कमी होईल हे लक्षात घेत नागरिकांनी कोव्हीड अनुरूप योग्य वर्तन ठेवत सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करून तसेच लसीकरण करून घेऊन तिसरी लाट लांबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.   


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.