Skip to main content

खारघर येथील विश्वज्योत शाळेने केला कहर, फी नाही भरली म्हणून थेट २८ विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा अवैधरित्या दाखला पोस्टाने दिला घरी पाठवून !!

 युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव यांनी घेतली दखल, पालकांसोबत करणार आंदोलन !*


 कोविड काळातही नवी मुंबईतील विश्वजोत इंटरनॅशनल स्कुल खारघर शाळेचा पराक्रम !! 


एकाच दिवशी २८ विद्यार्थ्यांना अवैधरित्या जबरदस्तीने दिले  "लिव्हिंग सर्टिफिकेट" !! 


पालकांना आपल्या हक्कांसाठी, विद्यार्थी हक्कांसाठी लढण्याचा हक्क घटनेने दिला आहे आणि खारघर मधील शेकडो पालकांनी ह्याच हक्काचा उपयोग करीत विश्वजोत शाळेने अवैधरित्या वाढविलेल्या फी च्या विरोधात लढा सुरू केला.


शेकडो पालक २०१८ पासून ह्या वाढीव फी बाबत भांडत आहेत, मिटिंग होत होत्या पण नियमानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका आणि अधिकृत अधिकाऱ्यांनी मिटिंग ला बसायला हवं पण पालकांसोबत मार्केटिंग वाले आणि ज्यांना फी बाबत कोणताही अधिकार नाही अशा लोकांना बसविले जाते त्यामुळे ह्या वाढीव फी बाबत कोणताही तोडगा निघाला नाहीय आणि पालक प्रतीक्षेत राहीले आहेत.


त्यात गेल्या वर्षांपासून कोविड मुळे शासनाचाच निर्णय आला की ह्या काळात कोणतीही वाढीव फी भरू नये आणि शाळांनी इतर वाढीव शुल्क लावू नये तरीही ह्या शाळेने अतिरिक्त फी लावली आणि मागील फी या इ आत्ताची फी असे मिळून लाखोंची फी मेल द्वारे पाठविली .


शाळा गेल्या वर्षांपासून बंद आहेत, बस, वीज वापर, बाकी सर्वच खर्च जो पूर्वी शाळांना यायचा तोह बंद झालेला असतांना सुद्धा शाळेने वाढीव फिज पाठविल्या आहेत, कहर म्हणजे मुलं शाळेत जात नाहीत तरी स्पोर्ट्स फी आकारली गेली आहे हे मोठं विलक्षण लूट आणि संतापजनक आहे. ह्याच कारणामुळे पालकांनी ही वाढीव आणि चुकीची फी भरण्यास शाळेला नकार दिला असता ह्या मजोरी शाळेने २८ विद्यार्थ्यांना थेट शाळेतून काढून टाकले आहे आणि पोस्टाने त्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या घरी पाठविले आहे.


ह्या घटनेने खारघर मधील समस्त पालकांमध्ये संताप निर्माण झाला असून आतातरी ह्या मुजोर शाळांवर सरकारने, शिक्षण अधिकाऱ्यांनी लगाम घालून त्यांना कडक शासन करण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांजकडे केली आहे.


२० दिवस झाले शाळेने असं बेकायदेशीर रित्या मुलांना शाळेतून  काढून त्यांना ऑनलाईन क्लास मधून काढून त्यांचा शिकण्याचा अधिकार काढून घेतला आहे आणि हे घटनेने दिलेल्या 'शिक्षणाचा अधिकार" कायद्याचे उल्लंघन असल्याचे ह्यावेळी बोलतांना युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


शाळा जुमानत नसून कोणताही तोडगा काढण्यास, चर्चेला तयार नाहीत, रायगड शिक्षण अधिकारी, आयुक्त व शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी वारंवार भेटून ही काही कारवाही शाळेवर केली नाहीय त्याचमुळे पालक युवासेनेचे सह सचिव रुपेश पाटील यांजकडे आले त्यांनी पालकांचे म्हणने ऐकून शाळेला फोन केला मात्र तातडीने मिटिंग देण्यास टाळाटाळ केली व मुद्दामहून पालकांना परत नोटिसा पाठीवल्या गेल्या, ह्या विश्वज्योत शाळेच्या मुजोरी विरोधात युवासेना पालकांच्या सोबत असून पालकांची समस्या तातडीने पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांजकडे मांडली असून तातडीने ह्यावर कारवाही करावी व शाळेला शासन करावे ही विनंती केली आहे.


चुकीची फी वाढ केल्यामुळे ह्याआधीही शाळेवर कारवाही होऊन २००८ साली शाळेची परवानगी काढून घेण्यात आलेली होती तरी सुद्धा परत अनधिकृत रित्या, शाळांनी फी साठी बळजबरी करू नये, मुलांना काढू नये असे शासनाचे आदेश असतांना सुद्धा महाराष्ट्रात शाळेची अतिशयोक्ती कारवाही म्हणून ह्या शाळेने मुलांना थेट शाळेतून काढून शाळा सोडल्याचा दाखला जबरस्तीने दिला आहे!


युवासेना पालकांच्या सोबत असून लवकरच शाळेसमोर आंदोलन करण्याची तयारी करत आहे असे ह्यावेळी बोलताना रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.