पनवेल(प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात योग प्रशिक्षक अर्चना शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांनी योगसाधना केली, तर सूर्यनमस्कार स्पर्धेसही योगप्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, भाजप तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अयुब अकुला आदी उपस्थित होते.
गटनिहाय विजेते
महिला ः 12 ते 21 वर्षे - प्रथम जयश्री लांडे, द्वितीय प्रियांका जोमराज, तृतीय अनघाश्री एस., चतुर्थ मृण्मयी ठाकूर व प्रणाली माने; 22 ते 35 वर्षे - प्रथम पूर्वा मनुरकर व प्रिया सिंग, द्वितीय शुभांगी जवेरी, तृतीय ऋतुजा तुषार, चतुर्थ पूजा लोंढे व रुही तालस्कर; 35 ते 60 वर्षे - प्रथम अंजली देवानी, द्वितीय गीता पवार, तृतीय अश्विनी बोरुडे, चतुर्थ छाया जोगडिया. पुरुष ः 12 ते 21 वर्षे - प्रथम वरुण सकपाळ, द्वितीय देवराज पाटील, तृतीय सर्वेश गुप्ता, चतुर्थ देवेश जोमराज व मनोमय भोसले; 22 ते 35 वर्षे - प्रथम विक्रम आपटे, द्वितीय आदित्य उपाध्ये, तृतीय मयुरेश कामाने, चतुर्थ किरण मोरे व अक्षय सापने; 35 ते 60 वर्षे - प्रथम विकास देशमुख, द्वितीय निलेश कालेकर, तृतीय पुनीत शारदा, चतुर्थ मकरंद आठवले व आदित्य मिश्रा.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment