खारघर (प्रतिनिधी)- युवाप्रेरणा सामाजिक संस्था, भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडल व सुमन्स ऐरोबीकस अँड योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल सेक्टर 19,खारघर येथे जागतिक योग दिनानिमित्त योगासने करत योग दिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी रघुनाथ ताटे (राधाजीवन दास)
नित्यानंद गौरंग योग & वैल्यू एजुकेशन स्कूल यांनी उपस्थित सर्वांना योगासने शिकवत योगाचे महत्त्व सांगितले. सदर योग शिबिराचे आयोजन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केले होते. शिबिराचे उदघाटन भाजपा खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील,सुमन हेगडे ,दिलीप जाधव यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आले. आजच्या या योग शिबिरात खारघर मधील आंतरराष्ट्रीय स्थरावरील टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने देखील उपस्थित राहत योगासनांचे धडे घेत योग शिबिरात आपला सहभाग नोंदवला. सदर योग शिबिरात भाजपा खारघर तळोजा मंडल सरचिटणीस दिपक शिंदे , भरत कोंढाळकर, मुकेश गर्ग, शोभा मिश्रा, निर्मला आळेकर, हे उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment