खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल डी मार्ट जवळ से 15 याठिकाणी बिना डिग्री चे बोगस डॉक्टर हे पेशंट्स तपासणी करीत असल्याची माहिती खारघर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना माहिती मिळाली लागलीच पनवेल महानगर पालिकेचे डॉक्टर यांना बोलवून सदर हाॅस्पीटल येथे बनावट पेशंट्स ला पाठविण्यात आले त्यास कुठलाही आजार नसताना तेथे असलेल्या बनावट डॉक्टर ने त्याच्या खाली असलेल्या मेडिकल स्टोअर मधुन औषधी आणायला सांगुन 1,000 रू चेकअप फि घेतली त्यानंतर खारघर पोलिसांनी सदर हाॅस्पीटल येथे छापा मारून बनावट बोगस डॉक्टर आरोपी नामे रोहित गुप्तेश्वर यादव वय 27 वर्ष यास ताब्यात घेवुन त्याची सखोल चौकशी करता त्याने गोवंडी शिवाजीनगर मानखुर्द येथे कंपाऊंडर चे काम केले असुन येथे तो RMO म्हणून पेशंट्स तपासात असल्याचे निष्पन्न झाले त्यास सहपोनि पाटील यांनी अटक केली असुन मा कोर्टाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवले आहे या बोगस डॉक्टर ने किती पेशंट्स तपासुन चुकीचे औषधोपचार केले असतील त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला तर करोनाच्या नावाखाली पेशंट्स दगावले असे सांगून खारघरवासीची लुट फसवणूक खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल डी मार्ट जवळ से 15 या हाॅस्पीटल कडुन झाली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी खारघर रहिवाशांकडून होत असुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी बोगस डॉक्टर ला पकडुन लोकांचे जीव वाचवले याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सदर गुन्ह्याचा तपास मा पोलीस उपायुक्त झोन 1पाटील सो व वपोनि शत्रुघ्न माळी यांचे मार्गदर्शनानुसार API पाटील हे करीत आहेत...मा सुधाकर देशमुख पनवेल महानगर पालिका आयुक्त यांनी खारघर पोलीस टीमचे अभिनंदन केले
Comments
Post a Comment