Skip to main content

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 726 बूथवर 60971 हजाराहून अधिक मुलांना पल्स पोलिओ लसीकरण

 


नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये याठिकाणी 607 स्थायी बूथ तसेच रेल्वे स्टेशन, बस डेपो, मॉल, डि मार्ट अशा 92 ठिकाणी अस्थायी बूथ तसेच दगडखाणी, उड्डाणपूलाखाली, रेल्वेलगत असलेल्या झोपड्या, बांधकाम ठिकाणे अशा ठिकाणी 28 मोबाईल बूथ अशाप्रकारे विविध जागी एकूण 726 लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. 5 वर्षाखालील साधारणत: 87 हजार लाभार्थी बालके नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.

      सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत दिवसभरात नवी महानगरपालिका क्षेत्रात 5 वर्षाखालील 60 हजार 971  बालकांनी पल्स पोलीओ लसीकरणाचा लाभ घेतला. ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे काही कारणांमुळे लसीकरण झालेले नाही त्यांच्याकरिता इन्टेन्सिफाईड पल्स पोलीओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत असून दि. 28 जून ते 2 जुलै 2021 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलीओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता 763 पथके निर्माण करण्यात आलेली आहेत.

      कोव्हीड प्रभावित काळात ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम होत असल्याने व त्यातही 5 वर्षाखालील लहान बालकांना हे लसीकरण केले जात असल्याने सर्व बूथवर कोव्हीड प्रतिबंधात्मक सुरक्षा बाबींचे पालन करण्यात आले.  तशा प्रकारच्या काटेकोर कार्यवाहीच्या सूचना बूथवर कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवक यांना प्रशिक्षणाच्या वेळी देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून सर्व बुथसमोर सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. बुथवर हात धुण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. मास्क व हँडग्लोव्हजचा वापर लसीकरण प्रक्रियेत सहभागी स्वयंसेवकांना अनिवार्य करण्यात आला होता. स्वयंसेवकांसह पालक नागरिकांनीही मास्क परिधान करण्याचीही काळजी घेण्यात आली होती.


बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात आले. तसेच लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन बालकाची हनुवटी पालकांनाच पकडायला सांगून बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लांबूनच लस पाजण्यात येत होती. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्कींग करतानाही बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्कींग करण्यात येत होते. अशा प्रकारची काळजी सर्व पोलिओ बूथवर घेण्यात आली.

      आपले नवी मुंबई शहर अर्थात पर्यायाने आपले राज्य आणि देश पोलिओमुक्त रहावा यादृष्टीने पल्स पोलिओ लसीकरण अत्यंत महत्वाचे असून आरोग्यप्रेमी नवी मुंबईकर पालक नागरिकांनी मोहीमेला चांगला प्रतिसाद दिला. मात्र  5 वर्षाखालील ज्या बालकांचे पल्स पोलीओ लसीकरण झालेले नसेल अशा बालकांच्या घरांना भेट देणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य स्वयंसेवकांना बालकांबाबत सत्य माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आ


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.